महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : व्याहाळी व काटी केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद गुगल मीट ॲपवर बुधवारी (दि.३० सप्टेंबर) उत्साहात पार पडली. या शिक्षक परिषदेत ७२ शिक्षकांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांनी या परिषदेचे प्रास्ताविक केले. कौठळीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक भारत ननवरे यांनी ताणतणावाचे व्यवस्थापन, ताणाचे प्रकार, कारणे, परिणाम, तणावावर परिणाम करणारे घटक, स्वभाव दोष, व्यवस्थापन तंत्रे व उपाय याची माहिती दिली.
मिसाळ वस्ती शाळेचे उपशिक्षक सागर मिसाळ यांनी विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन, आकारिक व संकलित मूल्यमापन साधने, ऑफलाईन मूल्यमापन गरज व उद्दिष्टे, ऑफलाईन कृतिपत्रिका यावर विस्तृत माहिती दिली. तामखडा शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोंग यांनी कृतिपत्रिका नमुने उदाहरणांसह स्पष्ट केले. अजिनाथ आदलिंग, अनिल रुपनवर, दत्तात्रय लकडे यांनी मनोगते व्यक्त केली.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.