विजेच्या धक्क्याने बाप लेकासह चार शेतकऱ्यांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना
महाबुलेटीन न्यूज l संतोष म्हस्के
भोर : पुणे–सातारा महामार्गावरील निगडे ता. भोर येथे विजेचा शॉक लागून मुलगा व वडिलांसह चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याचीघटना गुरुवार दि. १५ घडली. या दुर्दैवी दुर्घटनेमुळे निगडे गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
गुंजवणी नदी पात्रातील पाण्याच्या बंधाऱ्यांमध्ये मोटर बसवण्यासाठी गेले असताना अचानक वीज सुरू झाल्याने पाण्यात वीज प्रवाहउतरून विठ्ठल सुदाम मालुसरे ( वय– ४५ ), सनी विठ्ठल मालुसरे ( वय–२६ ), आनंद ज्ञानेश्वर जाधव ( वय–५५ ) व अमोल चंद्रकांतमालुसरे ( वय–३६, सर्व रा. निगडे, ता.भोर, जि. पुणे ) या चौघांना पाण्यात विजेचा धक्का बसून चौघांचा जागीच मृत्यू झाला.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे या चार शेतकऱ्यांना जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चारहीमृतदेह पाण्यातून बाहेर काढले असून चौघेही एकाच गावातील असल्याने निगडे गावावर शोककळा पसरली आहे.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.