महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
चाकण : येथील श्री. एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन व विद्याव्हँली इटरनँशनल स्कूल प्रशालेत ७४ वा स्वातंत्र्यदिन तंत्रज्ञानाचा उपयोग करून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशालेत स्वातंत्र्यदिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला.
कोवीड १९ या विषाणू प्रादुर्भावामुळे सर्व जगावर न भुतो न भविष्यत असे संकट ओढवले असताना विद्यालयाने विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून शाळेतील शिक्षकांना ‘वेबेक्स अँप’ च्या माध्यमातून ध्वजारोहण, राष्ट्रध्वजास सलामी, राष्ट्रगीत, ध्वजगीत व भाषण इ. कार्यक्रम आपल्या घरूनच तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्यक्ष अनुभवता आला.
अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. शामरावजी देशमुख यांनी शिक्षकांना संबोधित करताना विद्यालयाने ऑनलाईन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कोणत्याही शैक्षणिक संकुलांचे महत्वाचे चार स्तंभ असतात ते म्हणजे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक पंरतू या जागतिक महामारीमुळे सध्या सर्व गोष्टी पुर्णपणे बंद आहेत. तरी देखील पालक व विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रज्ञानाची मदत घेऊन ऑनलाईन शिक्षण प्रभावी पणे यशस्वी रित्या घेतल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना कोवीड १९ मध्ये सुध्दा ऑनलाईन शिक्षण नाविन्यपूर्ण व दर्जेदाररित्या कसे देता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.
तसेच शिक्षक बंधू व भगिनींना कोवीड महामारी व शैक्षणिक धोरण या बद्दल माहिती दिली. सर्व शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना कोवीड महामारी या रोगाच्या अडचणीच्या काळात संस्था आपल्या पाठीशी उभी आहे असे आश्वासन दिले. सदर कार्यक्रम शासनाने नेमुन दिलेल्या सोशल डिस्टनशिगच्या नियमानुसार पार पडला. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. रोहिणीताई देशमुख, संध्या वाळुंज, संजय नवसरे, दास सर, गायकवाड सर व राऊत सर उपस्थित होते. कार्यक्रमांची प्रस्तावना श्री. दिपक शिंदे यांनी केली, तर प्राचार्या स्वाती रणदीवे यांनी आभार मानले.
—–
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.