आरोग्य

वेळ पडल्यास खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊ व त्याठिकाणीही कोरोना उपचार सुरू करू : आमदार मोहिते पाटील यांची ग्वाही… ● चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व आमदार मोहिते पाटील, सीओ आयुष प्रसाद यांची भेट

वेळ पडल्यास खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊ व त्याठिकाणीही कोरोना उपचार सुरू करू : आमदार मोहिते पाटील यांची ग्वाही…
● चाकण ग्रामीण रुग्णालयातील लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व आमदार मोहिते पाटील, सीओ आयुष प्रसाद यांची भेट

महाबुलेटीन न्यूज
चाकण : “कोरोनाची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. चाकणला ज्या गतीने कोरोनाचा प्रदूर्भाव वाढत आहे, त्या गतीने आपल्याकडे आरोग्य सुविधा उपलब्ध नाही. म्हणून अजूनही आरोग्य सुविधा करण्याची नितांत गरज आहे. आताच जिल्हाधिकारी व सीओ भेट देऊन सूचना दिल्या आहेत. दोन दिवसात सुविधा झाल्या नाहीतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना भेटून जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे. वेळ पडल्यास खासगी हॉस्पिटल्स ताब्यात घेऊ व त्याठिकाणीही उपचार सुरू करू”, अशी ग्वाही दिलीपराव मोहिते पाटील यांनी दिली.

चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व आमदार दिलीपराव मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

यावेळी खेडचे उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, तहसीलदार वैशाली वाघमारे, रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. एन. जी. ढवळे, चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, तलाठी श्रीधर आचारी आदी उपस्थित होते.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Jun 2026

सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…

22 hours ago

MahaBulletin — 08 Jun 2026

रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…

3 days ago

MahaBulletin — 17 May 2026

शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…

4 weeks ago

MahaBulletin — 13 May 2026

रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…

4 weeks ago

MahaBulletin — 10 May 2026

शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…

1 month ago

MahaBulletin — 09 May 2026

शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…

1 month ago

This website uses cookies.