महाबुलेटीन न्यूज । अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेच्या त्रैमासिक सभेत ह. भ. प. बाजीराव शंकर चंदिले यांनी दिलेला सचिव पदाचा राजीनामा मंजूर करून रिक्त झालेल्या सचिव पदावर संस्थेचे माजी सचिव, ज्येष्ठ विश्वस्त ह. भ. प. सुखदेव शिवाजी पाटील उर्फ अप्पा बुबा महाराज यांची उपस्थित विश्वस्तांच्या झालेल्या सभेत एक मताने निवड करण्यात आल्याचे विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले महाराज यांनी सांगितले.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची त्रैमासिक सभा नुकतीच पार पडली. या सभेच्या विषय पत्रीकेतील विषया प्रमाणे आलेल्या ठराव क्रमांक पाच वर चर्चा होऊन ह. भ. प. बाजीराव शंकर चंदिले महाराज यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला. यामुळे रिक्त झालेल्या सचिव पदाचे जागेवर संस्थेचे माजी सचिव व ज्येष्ठ विश्वस्त ह. भ. प. सुखदेव शिवाजी पाटील उर्फ अप्पा बुबा उपस्थित विश्वस्तांच्या सभेने एक मताने निवड केली. संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. संदीपान महाराज पाटील आजारी असल्यामुळे सभेस उपस्थित राहू शकले नाहीत. सभेच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष ह. भ. प. केशव पंढरीनाथ उखळीकर महाराज होते. त्यांची त्रैमासिक सभेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.