महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : येथील वानप्रस्थाश्रमातील आजोबांचे जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार पार पाडले.
यशवंत नगर परिसरातील वानप्रस्थाश्रम या वृद्धाश्रमातील सदस्य विनायक दत्तात्रय वर्तक यांचा कोव्हिड 19 या आजाराने युनिक हॉस्पिटल तळेगाव स्टेशन येथे दुर्दैवी मृत्यू झाला. वानप्रस्थाश्रम तळेगावच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या उर्मिलाताई छाजेड या स्वतः कोव्हिड 19 या आजाराने ग्रस्त असल्याने हॉस्पिटलमधील प्रक्रिया पूर्ण करणे व या आजोबांचे अंत्यसंस्कार करण्याबाबतचा मोठा प्रश्न उर्मिलाताई छाजेड यांचे पुढे उपस्थित झाला होता.
उर्मिलाताई छाजेड यांनी सदर बाब जनसेवा विकास समीतीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना सांगितली. किशोर आवारे यांनी क्षणाचाही विलंब न करता युनिक हॉस्पिटलमध्ये जाऊन दिवंगत रुग्णाबाबत डॉ. विजय इंगळे यांच्या कडून सविस्तर माहिती घेतली व पुढील कार्यवाही करण्या बाबत मिलिंद अच्युत यांना सूचना दिल्या.
किशोर आवारे व जनसेवा विकास समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्व सोपस्कार पार पाडून दिवंगत आजोबांचे रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. किशोर आवारे गोरगरीब लोकांची सेवा अहोरात्र करत आहेत हीच आमच्या कार्यकर्त्यांची खरी प्रेरणा आहे, असे मिलिंद अच्युत यांनी या वेळी सांगितले.
०००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.