महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर
चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चाकण पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.
दोघेही सोमेश्वरनगर-सोरटेवाडी येथील राहणारे आहेत. आरोपींना खेड मधील बहुळ मधून ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित सुरेश गाडेकर ची शनिवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी बारामती पोलीस देखील आरोपींचा शोध घेत होते. ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. मयत रोहित गाडेकर हा आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशांचा तगादा लावत होता. तसेच त्यांना मारहाण करायचा याच कारणावरून रोहित गाडेकरची हत्या करण्याचा प्लॅन केला.
शनिवारी रोहित गाडेकरची हत्या करण्यात आली. आरोपी खेड तालुक्यामध्ये फरार झाले. चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना माहिती मिळाली की, आरोपी हे खेड तालुक्यातील बहुळ येथे एका गोठ्यात लपून बसले आहेत. पोलिसांनी तात्काळ जाऊन त्यांना ताब्यात घेतल आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे, अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.