महाबुलेटीन न्यूज
आळंदी (अर्जुन मेदनकर ) : आळंदीचे धार्मिक महत्त्व ओळखून संत साहित्याचे दाखले देत सर्व प्रकारच्या वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदीत आयोजित वाहतूक जंनजागृती दिंडीचे समारोपात आवाहन केले.
पोलीस निरीक्षक दिघी, आळंदी वाहतूक विभाग पिंपरी- चिंचवड यांच्या वतीने आळंदीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक जनजागृती दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते.
तत्पूर्वी फ्रुटवाले धर्मशाळेतून वाहतूक दिंडीची सुरुवात करण्यात आली. या दिंडीत रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत जनजागृती फलक, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचालित ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, शरदचंद्र पवार विद्यालयचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात वाहतूक नियमांचा फलकातून जनजागृती करण्यात आली. पाठीमागे शालेय मुले टाळकरी, भजनकरी टोपी कुर्ता या लक्षवेधी पोशाखात सहभागी झाली होती. लक्षवेधी पालखी मिरवणुकीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी व संत तुकाराम महाराजांची गाथा, पालखी वाहतूक नियमांच्या ओव्यांनी व पुष्पांनी सजविण्यात आली होती. लेझीम पथक, बैलगाडी, रथ आदींचे माध्यमातून जंनजागृती करण्यात आली.
वाहतुक जनजागृती दिंडीत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत दिसले, ज्ञनेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, नगरसेवक तुषार घुंडरे,माजी नगरसेवक डी.डी.भोसले.वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र चौधर, ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक अनिल रिकीबे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सचिन घुंडरे, ज्ञानेश्वर घुंडरे, प्राचार्य डॉ.थोरात, प्राचार्य दिपक मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे तसेच शालेय मुले, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.
जनजागृती दिंडीची सांगता फ्रुटवाले धर्मशाळा येथे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्रक पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. पसायदान गायनाने या दिंडीचे कार्यक्रमाची सांगता झाली. जनजागृती दिंडीत शाळा,महाविद्यालयातील मुले, स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.