विधायक

वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून आई-वडिलांनी गरजूंना मदत करून साजरा केला लाडक्या लेकीचा वाढदिवस

 

कडाचीवाडी येथील उद्योजक दत्ताशेठ खांडेभराड व ग्रा.पं. सदस्या रूपालीताई खांडेभराड या दाम्पत्याचा उपक्रम

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : शिवस्वराज प्रतिष्ठाणच्या संकल्पनेतून शिवस्वराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. दत्ताशेठ खांडेभराड यांनी या कोरोना काळात आपल्या एकुलत्या एक लाडक्या मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे.

वाढदिवस म्हटलं की आनंदाचा क्षण ! त्यात मुलांचा वाढदिवस म्हटलं की, आनंद द्विगणित होतो. प्रत्येक वर्षीचा वाढदिवस स्मरणी राहो म्हणून आपण काहींना काही प्रयत्न करत असतो. असाच काहीसा प्रयत्न दत्ताशेठ खांडेभराड व त्यांच्या पत्नी कडाचीवाडी ग्रामपंचायत सदस्या सौ. रूपालीताई खांडेभराड या दाम्पंत्यांनी केला. आपल्या एकुलत्या एक मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या कोरोनाच्या काळात आपण समाजासाठी काय करू शकतो, हा उद्देश डोळयासमोर ठेऊन दोघांनीही रक्तदान केले, तसेच नेत्रदान करण्याचा संकल्पही केला.

आपल्या लाडक्या मुलीच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून भिमाशंकर येथील अभयारण्यात असणाऱ्या वन्यप्राणी व पक्षी यांना धान्य, बिस्कटे, फळे देऊन आपल्या खेड तालुक्यांतील ज्या लोकांना अन्नधान्य नाही, अशा गरजू व गरीब लोकांसाठी १५ दिवस पुरेल इतका किराणा मालाचे १२५ किटचे वाटप त्यांनी केले.

प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री. मनोज खांडेभराड, कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब कड, सचिव श्री. किरण झिंजूरके व सौ. सपनाताई कड ( ग्रामपंचायत सदस्या ) यांनी या उपक्रमाचे अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून उपक्रम पार पाडला.

या सर्वामागचा हेतू हाच आहे की, आपण समाजाचे देणे आहोत. प्रत्येक जण आपापल्या परीने एकमेकांना मदतीचा हात दिला पाहिजे. आपल्या रक्तदानामुळे, नेत्रदानाने व अन्नदानाने अनेकांचे प्राण वाचू शकतात, या विचारांनी प्रेरित होऊन उद्योजक श्री. दत्ताशेठ खांडेभराड ( अध्यक्ष शिवस्वराज प्रतिष्ठाण ) यांनी यापूर्वी अन्नछत्र, रक्तदान शिबीर, धान्य वाटप, कोविड सेंटरला ब्लॅकेट वाटप ही समाज उपयोगी कामे करून कर्तव्यासोबत माणुसकी जपली आहे व हे कार्य यापुढेही चालू ठेवणार आहेत.

जिल्हा परिषद सदस्या सौ. रूपालीताई कड, तलाठी श्री. शाम वाल्हेकर, कडाचीवाडीचे सरपंच श्री.महादेव बचुटे, मेदनकरवाडीचे माजी उपसरपंच श्री. जगदीश मेदनकर, नाणेकरवाडीचे माजी उपसरपंच श्री. वासुदेव नाणेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. राजू ठाकर, उद्योजक श्री. विशालभाऊ कड, सामाजिक कार्यकर्ते व नवमहाराष्ट्र विद्यालयाचे कर्मचारी श्री. सुनिल कड यांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले.

 

हे काम फक्त प्रसिद्धीसाठी नाही, तर ह्यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी व जास्तीत जास्त जीवनावश्यक वस्तू जमा करून गरजवंतांना मदत करावी, हा यामागील उद्देश असल्याचे उद्योजक दत्ताशेठ खांडेभराड व ग्रा. पं. सदस्या रुपालीताई
खांडेभराड यांनी सांगितले.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.