पुणे जिल्हा

वडगाव पाटोळे येथे १५ दिवसांत बिबट्याचा दुसऱ्यांदा हल्ला, शेतकरी जखमी…

वडगाव पाटोळे येथे १५ दिवसांत बिबट्याचा दुसऱ्यांदा हल्ला… शेतकरी जखमी..

महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे (ता.खेड, जि.पुणे) येथील गायकवाड वस्तीजवळ आज बुधवार ( दि.१८ ऑगस्ट ) सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सुभाष निवृत्ती गायकवाड यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.  त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. गायकवाड यांनी आरडा ओरड केल्याने सुदैवाने ते हल्यातुन बचावले. याअगोदर ३ ऑगस्टला येथील युवकावर बिबट्याने हल्ला केला होता. १५ दिवसांत बिबट्याने वडगाव मध्ये हा दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.

गेली अनेक दिवसांपासून वडगांव पाटोळे परिसरात बिबट्याने धुमाकुळ घातला आहे. या परिसरात रानुबाई मळा, तोत्रे वस्ती, साबळे वस्ती आणि गायकवाड वस्ती येथे बिबट्या दिसून आला आहे. आता पर्यंत वनखात्याला साबळे वस्ती येथे बिबट्याला जेर बंद करण्यात यश आले आहे. अजून ही या परिसरात किती बिबट्याचा वावर आहे ? हे सांगता येत नाही. मात्र या बिबट्याच्या होत असलेल्या प्राण घातक हल्याने येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सुभाष गायकवाड हे आज सकाळी वस्तीजवळ असणाऱ्या कालव्या जवळून आपल्या घराकडे चालले होते. त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला करत जखमी केले. सुदैवाने त्यातून ते बचावले. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 20 Oct 2026

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…

8 hours ago

MahaBulletin — 19 Oct 2026

रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…

1 day ago

MahaBulletin — 18 Oct 2026

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…

2 days ago

MahaBulletin — 13 Oct 2026

सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…

1 week ago

MahaBulletin — 12 Oct 2026

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…

1 week ago

MahaBulletin — 09 Oct 2026

बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 दुष्काळी…

2 weeks ago

This website uses cookies.