पुणे जिल्हा

वडगाव पाटोळे मध्ये अखेर बिबट्याने घेतला महिलेचा बळी…

वडगाव पाटोळे मध्ये अखेर बिबट्याने घेतला महिलेचा बळी…

महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी 
राजगुरूनगर : वडगाव पाटोळे ( ता. खेड ) येथील साबळे वस्तीजवळ बोरमाळ येथे एका महिलेवर नरभक्षक बिबट्याने अचानक हल्ला करून ठार केले. जनाबाई वामन गडदे ( वय ६० ) असे हल्ल्यात मृत्यू मुखी पडलेल्या महिलेचे नाव असून माहेरचे नाव जनाबाई रामचंद्र पाटोळे असे आहे. या हल्ल्याने वडगाव परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हा बिबट्या हिंसक झाल्यामुळे माणसांवर प्राणघातक हल्ले करीत आहे. खेड भागात बिबट्याने आपली चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. मागील २ महिन्यापासून वडगाव पोटोळे आणि कडुस  परिसरात आतापर्यंत ७ व्यक्तींवर या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे. येथील साबळे वस्ती, गायकवाड वस्ती, रानुबाई मळा, तोत्रे वस्ती या भागात बिबट्याचा वावर नजरेस पडत होता. नुकतेच १८ ऑगस्ट रोजी गायकवाड वस्ती येथे एका तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता, मात्र सुदैवाने त्यातून ते बचावले होते. शेवटी आज अखेर बिबट्याने महिलेवर हल्ला करून बळी घेतलाच. ही धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे.

रात्रभर शोध घेतल्यानंतर आज ( दि. १ सप्टेंबर ) दुपारच्या सुमारास आजीचा मृतदेह एका शेतात आढळुन आला. या घटनेची माहिती मिळताच राजगुरूनगर येथील वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रदीप रौधंळ, वनपाल डी. डी. खापाळे, कासारे, वाघुले, वनरक्षक एस आर राठोड, एफ. सी. कदम, ढोले, अशोक वरुडे, बुट्टे, नाईकडे मॅडम, वरजे मॅडम आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.

“गावात बिबट्याच्या वावर वाढल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. याबाबत अनेकदा वनविभागाला निवेदन देऊन  काहीही निष्पन्न झाले नाही. आजच्या घटनेमुळे गावात मिटिंग घेऊन वनविभागाशी चर्चा करून सुरक्षार्थ पुढील  नियोजन करू व तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांना निवेदन देऊन लक्ष घालण्याची विनंती करू.”
— रामदास पाटोळे, माजी उपसरपंच (वडगाव पाटोळे)
————————————

 

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 10 Sep 2026

सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 जिल्हा…

45 minutes ago

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

1 week ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

This website uses cookies.