महाबुलेटीन न्यूज : वसंत शिंदे
पिंपरी-चिंचवड : जुन्नर, आंबेगाव, खेड या तालुक्यामध्ये बोगस ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट झाला असून संबंधित बोगस स्कुलवर कायदेशीर कारवाई करून बंद करण्यात यावी, अशी मागणी शासकीय परवानाधारक ड्रायव्हिंग स्कुल धारकांनी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यांमध्ये चार चाकी जड वाहतूक आणि मोटर सायकल चालवण्यासाठी याबाबत नागरिकांना ट्रेनिंग देण्यासाठी ड्रायव्हिंग स्कुल आहेत. ही सर्व स्कुल शासकीय नियम व अटीनुसार पिंपरी चिंचवड आरटीओ कडून शासकीय परवाना घेऊन नागरिकांना सुविधा देत आहे. मात्र दोन वर्षापासून तिन्ही तालुक्यामध्ये परिवहन कार्यालयाच्या शासकीय नियमांना बगल देऊन बिनदिक्कतपणे बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कुल सुरू झाली आहेत. शासकीय नियमानुसार ड्रायव्हिंग स्कुल धारकांना चालवण्यासाठी महिन्याला मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे, मात्र बेकायदेशीर ड्रायव्हिंग स्कुल एक चार चाकी गाडी घेऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दीडशे ते दोनशे स्क्वेअर फुट दुकानात चालू करून शासनाची फसवणूक करत आहेत. वास्तविक यामुळे नागरिकांना दुय्यम दर्जाचे आणि शास्त्रोक्त वाहन चालवण्याचे प्रशिक्षण न मिळाल्यामुळे वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. याचबरोबर बोगस स्कूल मुळे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसुल बुडत आहे.
————-–—–
बरेच जणांनी सदर बोगस स्कुल पान टपरी प्रमाणे थाटली असून यामधील एक बोगस स्कूल तर चक्क बियरबार शेजारी आहे.
—–—––———
याबाबत पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अशाप्रकारे शासकीय नियमांना बगल देऊन नियमबाह्य असणाऱ्या ड्रायव्हिंग स्कुलवर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अशा स्कुलमध्ये नागरिकांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केली आहे.
—–——––——
जुन्नर आंबेगाव खेड या तिन्ही तालुक्यांमध्ये शासकीय परवाना धारक ड्रायव्हिंग स्कुल एकूण २५ असून बोगस ड्रायव्हिंग स्कुलची संख्या ११ इतकी आहे.
——––———–
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.