महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. 29 ऑगस्ट : कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध (Lockdown) आता आणखी शिथिल होणार आहेत. Unlock 4.0 संदर्भात नवीन नियम केंद्र सरकारने (Unlock 4.0 guidelines) जारी केले आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून लॉकडाऊनचे नियम आणखी शिथिल होतील.
एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता मुभा असेल. तसंच राज्यांतर्गत प्रवासासाठीही वेगळी परवानगीची आवश्यकता नाही, असं केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स सांगतात. या नव्या नियमांमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत शाळा बंदच राहतील, असं सांगण्यात आलं आहे. मेट्रो मात्र 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
शाळा बंद असल्या तरी अनलॉक 4.0 मध्ये नववीच्या वरच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल तेव्हा शाळेत जायची परवानगी देण्यात आली आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E-pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.
असे आहेत नवे नियम :-
————–
– थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल राहणार बंद
– शाळा बंदच, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
– ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
– नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
– शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तकं किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
——–
बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…
मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…
पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
This website uses cookies.