महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
उरुळी कांचन : टिळेकरवाडी वि. का. सेवा सोसायटीच्या सभासदांकडून दिवंगत सचिवाच्या कुटुंबास आर्थिक मदत करून सामाजिक जाणीवेचा आदर्श घालून दिला.
टिळेकरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव लालासाहेब जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी गेले पंधरा वर्षांपासून टिळेकरवाडी वि. का. सेवा सोसायटीचे सचिव म्हणून उत्कृष्ट काम करत सभासद शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मदत करीत त्यांच्या प्रगतीस हातभार लावला होता. त्यांच्या कार्यकाळामध्ये संस्थेला जिल्हा बँकेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले याची जान ठेवून त्यांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी टिळेकरवाडी सोसायटीचे संस्थापक राजेंद्र तुळशीराम टिळेकर यांनी व संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वांच्या सहकार्याने त्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला.
संस्थेच्या सभासद व ग्रामस्थांनी स्वखुशीने रक्कम जमा करून रोख ७५ हजार रुपये व १०० किलो धान्य संस्थेचे सचिव कै. लालासाहेब जगताप यांच्या कुटुंबीयांना देत सामाजिक आदर्श प्रस्थापित करून समाजात वेगळा संदेश दिला आहे. ही मदत त्यांच्या घरी जावून त्यांची पत्नी दोन मुली व मुलगा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी उरुळी कांचन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण (आबा) टिळेकर, संस्थेचे संचालक अक्षय टिळेकर, सामाजिक कार्यकर्ते किसन टिळेकर उपस्थित होते.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.