महाबुलेटीन न्यूज । प्रतिनिधी
चाकण एमआयडीसी : “तरुणांनी राजकारणात जाण्यापेक्षा उद्योग व्यवसायात आपले स्थान निर्माण करावे, ग्रामपंचायत निवडणुकीत लाखो रुपये खर्च करुन एकमेकांची जिरवण्यापेक्षा ते पैसे व्यवसायात कामी लावावे व मराठी माणसाने यशस्वी उद्योजक व्हावे,” असे प्रतिपादन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी सावरदरी येथे केले. येथील राष्ट्रवादी काँग्रेस संपर्क कार्यालय व एस.के. LED इंडस्ट्रीजचे उदघाटन आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अरुण चांभारे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे, माजी सभापती रमेश राळे, माजी सभापती विलास कोतोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गाढवे, उद्योजक बाबाजीशेठ शेटे, युवा नेते मयुर मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास गडदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास लिंभोरे, पश्चिम विभाग अध्यक्ष अमोल पानमंद, स्वामी येळवंडे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोत्रे, सरपंच वसंत भसे, माजी उपसभापती कैलास गाळव, सरपंच व राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. युवा नेते रवींद्र गाढवे यांनी सूत्रसंचालन केले, तर उद्योजक बाबाजीशेठ शेटे यांनी आभार मानले.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.