महाबुलेटीन न्यूज : विलास भेगडे
तळेगाव दाभाडे : तळेगाव – चाकण – शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. (548 डी) साठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकूण 24 किलोमीटर रस्ता दुरुस्ती व मजबुतीकरण अंतर्गत कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. याकामासाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी महाबुलेटीन न्यूजशी बोलताना दिली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या सूचनेनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे. तळेगाव ते चाकण या परिसरात औद्योगिक क्षेत्र असून नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. हा रस्ता औद्योगिक वसाहतीचा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे वाहनचालक, कामगार, स्थानिक ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता कुठलेही संपादन न करता तळेगाव ते चाकण असे 24 किलोमीटर अंतरात 12 मीटर रुंद असे काँक्रिटीकरण करणेकामी तीनशे कोटी रुपये खर्चाची मंजुरी मिळाली आहे.
तळेगाव – चाकण रस्ता काँक्रिटीकरण झाल्यास वाहतूक कोंडी समस्या कमी होईल. भविष्यातील विचार करता या भागातील विकासाला अधिक चालना मिळण्यास मदत होईल. असे आमदार शेळके यांनी सांगितले. या कामासाठी शरद पवार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सहकार्य केल्याबद्दल मावळच्या जनतेच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांनी त्यांचे आभार मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.