मनोरंजन

अभिनेता सुभाष यादव करणार तब्बल 11 सेलिब्रिटींसोबत पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा शो!!!

एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 11 अभिनेत्री सेलिब्रिटी सोबत कॉमेडीचा बादशहा व प्रसिद्ध अभिनेता ऍडव्होकेट सुभाष यादव 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत शेवाळवाडी फाटा, नंदिनी टकले नगर या • ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा सुभाष यादव प्रस्तुत कॉमेडी तडका होम मिनिस्टर’ हा शो सादर करणार आहे.

हडपसर( वार्ताहर विकास निलजकर): हा कार्यक्रम न भूतो न भविष्यतो एवढा मोठा करण्याचे नियोजन केलेले आहे. प्रसिद्ध उद्योजक व बांधकाम व्यावसायिक श्री राजननाना टकले व त्यांचे सुपुत्र युवा उद्योजक प्रथमदादा टकले यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

या भव्य दिव्य संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. या कार्यक्रमासाठी अंदाजे 15000 पेक्षा जास्त महिला व पुरुष प्रेक्षकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. लाईव्ह अनुभव घेण्यासाठी मोठ्या स्क्रीनची देखील सोय केलेली आहे तसेच सर्वांसाठी नाष्टा व मिनरल वॉटरची सोय करण्यात आलेली आहे. तरी परिसरातील सर्व माता भगिनी, पुरुष बंधू सर्वांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी व बक्षिसे जिंकण्यासाठी तसेच आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सोबत सेल्फी घेण्यासाठी उपस्थित राहावे अशी विनंती श्री राजननाना टकले यांनी केली आहे.

कॉमेडी तडका या शोच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला, रोल नंबर 18, ब्लॅकेट, वचपा या चित्रपटांचा प्रमुख अभिनेता, विनोदाचा झंजावत असलेला, ऑन द स्पॉट कॉमेडी करणारा हजरजबाबी अभिनेता सुभाष यादव हा या संपूर्ण कार्यक्रमाचे अँकरिंग व नियोजन करणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख सेलिब्रिटींपैकी ऋता दुर्गुळे (फुलपाखरू झी मराठी व टाइमपास चित्रपट फेम), प्राजक्ता गायकवाड (स्वराज्य रक्षक संभाजी फेम येसूबाई), माधुरी पवार (तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब व अप्सरा आली शोची विजेती) रुक्मिणी सुतार (देव माणूस फेम सरु आजी), गायत्री जाधव (बबन, एकदम कडक फेम मुख्य अभिनेत्री), आयली घिया (हंटर फेम बॉलीवूड अभिनेत्री व फिट इंडिया चॅम्पियन) मयुरी घाडगे (सांज फेम), प्रमाला साळुंखे (मार्तंड मल्हारी फेम), रश्मी दहिरे (मॉडेल अभिनेत्री), जयश्री सोनुने (एकदम कडक फेम) या सेलिब्रिटींसोबत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रथम उपस्थित 5000 महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच प्रथम क्रमांकासाठी मानाची पैठणी व वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकासाठी 32 इंची एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी ब्रँडेड ओवन व अशी इतर आणखी सात बक्षिसे म्हणजेच एकूण दहा मोठी बक्षिसे व सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सहभागी महिलांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून तीन विजेत्या महिलांना पुणे शहर दर्शन हेलिकॉप्टर द्वारे सप्रेम भेट देण्यात येणार आहे व त्यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थिती अनिवार्य आहे. प्रवेश विनामूल्य असून लहानांपासून आजी-आजोबांपर्यंत सर्व प्रेक्षक या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात.

आपला सहभाग नोंदवण्यासाठी नंदिनी टकले नगर येथील नंदिनी बेलस या ऑफिसमध्ये नोंदणी सुरु करण्यात आली असून तेथे आपले नाव विनामूल्य नोंदवावे अशी विनंती राजननाना टकले व प्रथमदादा टकले यांनी केली आहे.

निमंत्रक – राजननाना टकले व प्रथमदादा टकले

admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.