कालची सुशांतची बातमी त्रासदायक होती. ऐन उमेदीच्या काळात यश, प्रसिध्दी, पैसा पायाशी लोळत असताना त्याचा हा निर्णय न झेपणारा होता. त्यानंतर एक ट्रेण्ड सुरू झाला.#speak_up_before_give_up.पण एखादा आपलं दुःख घेऊन व्यक्त होतो, त्यावेळी त्याचं दुःख, त्याच ग्रॅव्हिटीने किती जण समजुन घेतात? ग्रामीण भाषेत एक परवलीचा म्हण आहे, “ज्यात जळतं, त्यालाच कळतं.”
सुशांतनं ही स्वतःला व्यक्त केलं असेल, पण त्याच्या भावनांची कदर झाली नसेल. आपल्या आसपास आपण पाहतोच की, एखाद्याचा हळवा कप्पा समजुन घ्यायचा अन् नंतर त्याच कप्प्यांचा सार्वजनिक बाजार करायचा. कुणाच्या आयुष्यात हिरो नाही बनता आलं तरी हरकत नाही, पण व्हिलन बनू नका.
मृत्यु हे अंतिम सत्य आहे म्हणुनच की काय सुशांतसारखे कैक जण शेवटचा पर्याय म्हणुन त्याचाच स्विकार करतात. एखाद्याच्या प्रगतीच्या वाटेतला काटा होण्यापेक्षा आत्महत्येच्या वाटेतला काटा बनणं कधीही चांगलं. मृत्युनंतर खांदा देण्यापेक्षा जगायला आधार देता येणं, खुप सुखावणारं आहे. आपल्या आसपास पण असेल कोणी “सुशांत”, तर त्याला नवीन ऊर्जा द्या, नवचैतन्य द्या जगायची संधी पुन्हा मिळवून द्या.
निराशेच्या गर्तेतुन बाहेर यायचं असेल तर फक्त एकच पर्याय आहे, मित्र. आपले असे मित्र ज्यांना आपला संघर्ष माहित आहे आणि ज्यात त्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावुन शेवट पर्यंत साथ दिली.
सुशांतचं निरोप घेणं खुप काही शिकवणारं आहे. पैशानं माणुस सुखी होऊ शकतो, समाधानी नाही. कोणत्याही संकटाला आत्महत्या हा पर्याय कधीच असु शकत नाही.
आपलाच,
प्रा.मयूर दिलीप जायभाय
सहाय्यक निर्देशक
BlitzIAS Academy,
शिवाजीनगर,पुणे.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.