पुणे जिल्हा

सुरेशभाऊच खरे कार्यसम्राट आमदार, त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करू, हीच त्यांना खरी आदरांजली आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

सुरेशभाऊच खरे कार्यसम्राट आमदार, त्यांनी हाती घेतलेली कामे पूर्ण करू, हीच त्यांना खरी आदरांजली आहे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
● भाऊंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, कोरोना योद्धा पुरस्कार व रामयणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे प्रवचन संपन्न…

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर 
चाकण : “लोकप्रतिनिधी कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुरेशभाऊ गोरे… सुरेशभाऊंनी लोकांची कामे केली. ते कधी स्वतःच काम घेऊन आले नाही. विरोधकांना त्यांनी कामातून उत्तर दिले. ते खऱ्या अर्थाने कार्यसम्राट आमदार होते. त्यांनी हाती घेतलेली कामे व प्रकल्प पूर्ण करायचे असून, हीच त्यांना खरी आदरांजली आहे”, असे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाऊंच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी, कोरोना योद्धा पुरस्कार व रामयणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांचे प्रवचन आदी उपक्रम संपन्न झाले. 

ना. शिंदे पुढे म्हणाले, “आजची ही उपस्थिती म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. भाऊ अत्यंत मितभाषी होते, कोणावर रागावणार नाही, सर्वांशी प्रेमाने बोलणे हे गुण त्यांच्या अंगी होते. स्वभावाप्रमाणे त्यांनी खूप माणसं जोडली. त्यांनी लोकांसाठी कामे केली. त्यांनी संधीचं सोनं करून सत्तेचा वापर स्वतःसाठी न करता लोकांसाठी केला. सगळ्यांना एकत्र एकत्र ठेवणे, माणसं जोडणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्या सारखा उपक्रम राबवून समाजाला आदर्श घालून दिला.”

“२०१९ च्या निवडणुकीत ते पराभूत होऊन सुद्धा तेवढ्याच हिरहिरीने त्यांनी जनतेची कामे सुरू ठेवली, हा त्यांचा विशेष गुणधर्म होता. त्यांनी पाच वर्षात सभागृहात धोरणात्मक प्रश्न मांडले. आणि त्याची दखल सभागृहाने घेतली. ते प्रामाणिकपणे कामाचा पाठपुरावा करायचे. सर्वांना हवाहवासा वाटणारा लोकप्रतिनिधी आपणातून हरवला आहे. लोकांच्या मनात त्यांनी मोठं स्थान निर्माण केलं आहे.”

“चाकण नगरपरिषद पाणीपुरवठा साठी ७० कोटी मंजूर केले असून त्याला चालना द्यायची आहे. चाकण नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी ५ कोटी निधी देऊ, असे त्यांनी आश्वासन दिले. भाऊंच्या नावाने ग्रंथालय, सांस्कृतिक गृह अशी एखादी वास्तू करा, त्यासाठी मी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देईल, असे आश्वासन देऊन राजगुरूनगर व चाकण या दोन्ही डीपीआर मंजूर करू तसेच पंचायत समितीच्या इमारतीची भाऊंची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवू”, असेही ना. शिंदे यांनी आश्वासन दिले.

यावेळी उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी मंत्री सचिन अहिर, माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, मा. आमदार गौतम चाबुकस्वार, जगन्नाथ शेवाळे, देवेंद्र बुट्टे पाटील, सुलभा उबाळे, श्रद्धा कदम, सुरेशभाऊ भोर, महिला आघाडी जिल्हा समन्वयक विजयाताई शिंदे, तालुका प्रमुख नंदाताई कड, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोलदादा पवार, माजी उपसभापती राजू जवळेकर, माजी उपसभापती ज्योतीताई अरगडे, दिलीप मेदगे, कालिदास वाडेकर, स्व. माजी आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, माजी जिल्हा प्रमुख अशोक खांडेभराड, उपजिल्हा प्रमुख शिवाजी वरपे, विजय शिंदे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, माजी तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, युवा तालुका प्रमुख विशाल पोतले, ग्राहक सेनेचे जिल्हा उपप्रमुख लक्ष्मण जाधव, चाकणच्या प्रथम नगराध्यक्षा पुजाताई कड, माजी नगराध्यक्ष शेखर घोगरे, माजी उपनगराध्यक्ष मंगलताई गोरे, माजी नगराध्यक्षा स्नेहाताई जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे, शहर प्रमुख महेश शेवकरी, सुदाम कराळे, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्वपक्षीय कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाऊंच्या परिवारातील त्यांच्या पत्नी मनिषाताई गोरे, किरण गोरे, ओमकार गोरे, बंधू दत्ताभाऊ गोरे, नितीन गोरे, उमेश गोरे, विकास गोरे, माणिक गोरे, राहुल गोरे, निलेश गोरे व त्यांचे आप्तेष्ट उपस्थित होते.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व पदाधिकाऱ्यांनी आपले भाऊंच्या कार्याला उजाळा देऊन भाऊंना अभिवादन केले. यावेळी कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, पत्रकार, कार्यकर्ते यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार व माजी उपसभापती राजू जवळकर या मान्यवरांच्या हस्ते ‘कोविड योद्धा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर रामयणाचार्य हभप. रामराव महाराज ढोक यांचे प्रवचन संपन्न झाले.

सुदामराव कराळे व सूर्यकांत मुंगसे सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.