संक्रमन हा सृष्टीचा नियम आहे. या नियमानुसार पत्रकारिता त्यास अपवाद नाही. पत्रकारितेचे आद्य जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास विविध माध्यमांच्या निर्मितीतून इथपर्यंत येऊन पोहचला
खरे तर डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताशी साधर्म्य सांगणारे हे संक्रमन. शेपटीचा उपयोग नाही, म्हणून माणसाची शेपटी हळूहळू नष्ट होत गेली. उत्क्रांतीच्या या ढोबळ परिमानाशी पत्रकारितेतील संक्रमन चपखल बसते. त्यानुसारच तंत्रज्ञानाचा आधार घेत पत्रकारितेने संक्रमणाचा एकेक टप्पा गाठला. अतिशय गतिमान आणि विश्वव्यापी स्वरूप पत्रकारितेचे बनले.
पत्रकारितेतील हा व्यापक बदल खूप सकारात्मक आहे. पत्रकारिता कोणाची मक्तेदारी नाही, जणू हाच संदेश विविध माध्यमातून आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीतून मिळत आहे. एकूणच ही मध्यवर्ती कल्पना आणि गाठीशी असणारा काही अनुभव यातून ऊर्जा मिळाली. या उर्जेतून एक नवी वाट आणि या वाटेवरचे पाऊल टाकताना थोडं मनातलं बोलावेसे वाटले.
काळ बदलत आहे. काळानुरूप समाजही बदलत आहे. बदलत्या काळासोबत प्रश्नांचे स्वरूप, समाजाच्या आनंदाच्या कल्पना, सामाजिक स्वास्थ्य वगैरे बदलत आहे. याचे प्रतिबिंब विविध माध्यमातून उमटत आहे. हे प्रतिबिंब काहीशा वेगळ्या, वेचक-वेधक पद्धतीने उमटविण्याचा आमचाही प्रयत्न असेल. महा बुलेटिन न्यूज हे व्यासपीठ त्या प्रयत्नांचा भाग असेल. अधिकृतपणाची कास धरीत मोजकेपणाने हे व्यासपीठ तुम्हा सर्वांचे असेल. सडेतोड, निर्भीडतेची जोड या व्यासपीठावरून होणाऱ्या पत्रकारितेस असेल. आपलं हक्काचं व्यायापीठ सर्व घटकांशी विश्वासाचं नातं दृढ करील, याचा विश्वास या निमित्ताने देत आहोत. महा बुलेटिन न्यूज आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी सेवेत रुजू करीत आहोत. चला तर एक पाऊल सोबत टाकून सुरुवात करूया…समाजातील सर्व क्षेत्रातील घटकांना न्याय मिळावा व सर्वांना हक्काचं व्यासपीठ मिळावे, यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र डोळ्यासमोर ठेवून निर्भीड पत्रकारितेचा मानदंड हे ब्रीदवाक्य घेऊन आपल्या सेवेत रुजू होत आहे. आपली सर्वांची साथ अशीच सदैव आमच्या सोबत राहावी, ही विनंती.आपले विश्वासू सहकारी,
हनुमंत देवकर शिवाजी आतकरी
9822364218 9970719999
बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 राजगुरुनगरमध्ये…
सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 अन्नपदार्थ…
रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेडमध्ये…
गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 💧 खेड…
सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 दिल्लीत…
रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 खेड…
This website uses cookies.