शैक्षणिक

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी लालपरी सज्ज…

 

महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरूनगर : एम. एच. टी – सी. ई. टी. सन २०२० आणि यू. पी. एस. सी. या परीक्षा देणाऱ्या खेड व आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना राजगुरुनगर बस आगारातर्फे एस. टी. महामंडळाची बस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे राजगुरूनगरचे आगार प्रमुख रमेश हांडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या उपलब्ध झाली; तर योग्य ते तिकीट आकारणी करून त्यांना विविध केंद्रांवर सोडण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. 

राज्यात दि. १ ते २० ऑक्‍टोबर या कालावधीत महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत एम. एच. टी – सी. ई. टी. सामाईक प्रवेश परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्या २० ऑक्टोबर पर्यंत घेण्यात येणार आहेत. 

तसेच यू. पी. एस. सी. च्या परीक्षा दि. ४ ऑक्टोबर रोजी होत आहेत. त्यामुळे परिक्षार्थींना प्रवासाचा त्रास होऊ नये व वेळेत त्या ठिकाणी पोहचता यावे, म्हणून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसाठी जाणाऱ्या खेड व आंबेगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याबाबत अधिक माहितीसाठी राजगुरूनगर बस आगाराशी ०२१३५-२२२०३५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आगारप्रमुख रमेश हांडे यांनी केले आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.