महाबुलेटीनच्या वृत्ताची दखल : सोयाबीनचे बोगस बियाणे प्रकरणी लातुर जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल

महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : अगोदरच कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा कर्ज काढुन आपल्या काळ्या आईची ओटी भरण्यासाठी नामकिंत कंपनीचे सोयाबीन बियाणे आपल्या शेतात पेरले. माञ पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याशिवाय महाबुलेटीन न्यूज व लातुरचे माजी पालकमंञी आ.  संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हा प्रश्न लावुन धरला होता. अखेर प्रशासनाने या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या फिर्यादीवरुन शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात मध्यप्रदेशाच्या सारस अॅग्रो कंपनी विरुध्द दि. १२ जुलै रोजी फिर्याद दाखल केल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातुर येथील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पहिला तर शिरूरअनंतपाळ येथे बोगस बियाणे प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाल्याचे तालुका कृषी अधिकारी साहेबराव आडे यांनी सांगितले.
देशावर व संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचे महाभयंकर  संकट  सूरू आहे. या संकटामुळे सर्वच क्षेञ डबघाईस आले आहे. यातुन शेतकरीही सुटला नाही. शेतकर्‍याच्या नशीबी आठराविश्व दारिद्र्य त्याच्या पाचवीलाच पुंजले आहे. कधी अवर्षण, तर कधी ओला दुस्काळ त्यामुळे गेल्या तीन चार वर्षापासुन शेतकरी आपला सुखी संसार उघड्यावर टाकुन आत्महत्या करित आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडुन प्रयत्न केले जात असुनही निर्सगाच्या सपाट्यात सापडलेल्या शेतकर्‍याच्या आत्महत्या काही थांबत नाहीत.
शेतकरी पुन्हा खचुन गेला…
यावर्षी शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा नामकिंत कंपनीचे बियाणे पेरूनही उगवले नाही. महागामोलाचे बिबियाणे खरेदी करुन स्वत: कर्जात बुडुन खरेदी केलेले बीयाणे शेतीत पेरले. सुरवातीला निर्सगाने साथ दिली. माञ पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा खचुन गेला. बियाणे उगवण क्षमता चाचणी परभणी कृषी विद्यापिठाकडुन करण्यात आली. माञ हे बियाणे निकृष्ट व अप्रमाणित घोषीत करण्यात आले .
बोगस बियाणे कंपनी मध्यप्रदेशाची…
मध्यप्रदेशातील खांडवा येथे कार्यरत असलेल्या मे. सारस अॅग्रो इंडस्ट्रीजचे क्षेञीय अधिकारी राजेंद्र बापुसाजी गुलकरी ( वय ५१,  रा. यवतमाळ, महाराष्ट्र ) यांच्या विरुध्द शिरूरअनंतपाळ पं. स. चे कृषी अधिकारी साहेबराव आडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरूरअनंतपाळ पोलीस ठाण्यात फसवणुक बिबियाणे अधिनियमान्वेये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. डी. एम. वासुदेव हे करित आहेत.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.