शैक्षणिक

रोटरी क्लबतर्फे शिक्षकांसाठी स्मार्ट शिक्षण ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स

महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
पुणे : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ ची लिटरसी कमिटी शिक्षकांसाठी स्मार्ट ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी, डिजिटल / आयटी कौशल्ये वापरण्यास शिकवणारा ऑनलाईन सर्टिफिकेट कॊर्स घेणार आहे.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या  लिटरसी कमिटीने शिक्षकांसाठी आयोजलेला, आयटी साधनांचा वापर करून ऑनलाइन अध्यापनासाठी डिजिटल / आयटी कौशल्ये  शिकण्याचा ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हा एक अभिनव व उपयुक्त प्रकल्प आहे.
कोविड -१९ च्या परिस्थितीने शिक्षणक्षेत्रात असा काही अचानक बदल घडवून आणला की ज्याचा परिणाम शिक्षक-विद्यार्थी  यांच्यावर एकत्रितपणे झाला आहे. अचानकपणे उद्भवलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा आत्मविश्वासने सामना करण्यासाठी एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. हे प्रशिक्षण शिक्षकांना ऑनलाइन अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या १५ महत्त्वपूर्ण डिजिटल / आयटी कौशल्यांनी सुसज्ज करेल. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय संपूर्णपणे विनामूल्य असा हा कार्यक्रम आहे आणि शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समार्फत तो राबविला जाईल.
सोप्या मराठी आणि इंग्रजी भाषेतून स्पष्ट केलेले डिजिटल / आयटी कौशल्यांचे छोटे व्हिडिओ व त्यावर आधारीत प्रश्नांचा व्हीडिओ खास तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षकांशी शेअर केले जातील. पूर्ण दिवसभरात आपापल्या सोयीनुसार कधीही व कितीही वेळा शिक्षक ते व्हिडिओ पाहून  समजून घेऊ शकतात व उत्तरे पाठवू शकतात. त्यानंतरच्या दिवशी, नवीन कौशल्यांच्या व्हिडिओंसह, मागील दिवसाच्या प्रश्नांवरील उत्तरांचा व्हिडिओ देखील शेअर केला जाईल. ही प्रक्रिया सलग ५ दिवस चालेल. दररोज ३ नवीन कौशल्ये याप्रमाणे, शिक्षकांना ५ दिवसांत एकूण १५ कौशल्ये शिकता येतील.
हे व्हिडिओ डिजीटल / आयटी कौशल्यांवर आधारित असतील, जसे की मोबाइल हॉटस्पॉट कसा कनेक्ट करावा, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधून व्हिडिओ कसा तयार करायचा, स्निपिंग टूल कसे  वापरायचे … वगैरे. सहावा दिवस सरावाचा असेल. कार्यक्रमाच्या सातव्या दिवशी, शिक्षकांनी ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळेल.
हे प्रशिक्षण खास शिक्षकांसाठी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ – लिटरसी कमिटी तर्फे घेतले जाणार आहे. विविध रोटरी क्लबच्या मदतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे . हे ऑनलाईन प्रशिक्षण सोमवार, १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होईल आणि परीक्षा दिल्यानंतर रविवार, १६ ऑगस्ट २०२० रोजी संपेल व त्यानंतर शिक्षकांना त्यांच्या ई मेल वर प्रमाणपत्र प्राप्त होईल.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या  डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रश्मी कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे की, प्रत्येक शिक्षकाने या महत्वाच्या व नि:शुल्क ऑनलाईन कोर्सचा लाभ घ्यावा व नोंदणी करावी.
इच्छुकांनो, सहभागी व्हायचंय  ?
हि लिंक तुमच्या ब्राउझर मध्ये कॉपी करून गुगल फॉर्म भरून पाठवा : https://rebrand.ly/registration-marathi-paper
९५११८८९८२० या व्हॉट्सऍप नंबरवर आपली माहिती पाठवावी, असे आवाहन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ लिटरसी कमिटीचे चेअरमन रो. सुबोध मालपाणी – DLCC यांनी केले आहे.
( टीप : कृपया फोन करु नये )
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.