महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील हडपसर येथील इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सिरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे काम सुरु आहे.
दरम्यान, ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनच्या ‘कोविशिल्ड’ या लसीचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. हिंदुस्थानमध्ये या लसीच्या आपातकालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. ‘कोविशिल्ड’ लसीचे उत्पादन सुरू असलेली इमारत सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
—
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.