इतर

सिंहावलोकन… महाबुलेटीन न्यूज झाले तीन वर्षांचे…

सिंहावलोकनमहाबुलेटीन न्यूज झाले तीन वर्षांचे

टीम महाबुलेटीन

माध्यम क्षेत्रांमध्ये दोनतीन वर्षाचा कालावधी तसा अत्यल्पच म्हणावा लागेल. असे असताना गुणवत्ता या निकषावर मोजपट्टी लावायची झाल्यास, हा कालावधी स्वतःला सिद्ध करण्यास पुरेसा आहे. याच मोजपट्टीवर महाबुलेटीन न्युजने स्वतःला सिद्ध केले. एक निरपेक्ष, सडेतोड आणि सर्वसामान्यांचे व्यासपीठ म्हणून महाबुलेटीन न्युजने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. स्वतःला सिद्ध केले. माध्यमांच्या भाऊगर्दीत स्वतःचे वेगळेपण ठेवले. स्वतःचे वेगळेपण जपताना उच्च पातळीचा दर्जा राखला. सडेतोड आणि सत्यता याची सांगड घातली. याचाच परिणाम म्हणून महाबुलेटीन न्युज आज सर्वदूर पसरले. स्वतःचा वाचकवर्ग निर्माण केला. विविध माध्यमांच्यास्पर्धेत स्वतःची ओळख ठेवली.

रियल टाईम न्युजहे सूत्र बांधून महाबुलेटीन न्युज नेटवर्कची टीम कार्यरत राहिली. इथे ब्रेकिंगला महत्व देता वस्तुनिष्ठतेचा गाभा अबाधित ठेवला. त्यामुळे वाचक संख्या दिवसागणिक प्रचंड वाढत राहिली. तीन वर्षात वाचकांचा आकडा १२ ते १५ लाखांच्या आसपास गेला. इतकेच काय दोन दिवसापूर्वी महाबुलेटीनच्या फेसबुक पेजवर पोस्ट केलेलाधोंड्या धोंड्या पाणी देहा पाऊस लांबल्याने त्यावर आधारित व्हिडिओ तब्बल लाख ७८ हजार ६५८ लोकांपर्यंत पोहोचला असून हजारहून अधिक लोकांनी शेअर केला. ५० हजारहून अधिक दर्शकांनी पाहिला असून त्यावर ७९ हजारहुन अधिक वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी पोस्ट केलेला एक क्राईम व्हिडीओ अवघ्या दोन महिन्यात ७८ लाख लोकांनी पाहिला. ही आकडेवारी पाहता महाबुलेटीन न्यूजवर वाचकांचे किती प्रेम आहे आणि किती लोक जोडले गेले याचा प्रत्यय येतो. स्पर्धेच्या युगात आणि उदंड सोशल मीडियाच्या जमान्यात वरील आकडेवारी निश्चितच अभिमानास्पद आहे. आकडेवारी पहाता महाबुलेटीन न्युजवरील वाचकांचे प्रेम अधोरेखित होते.

खरेतर विश्वासार्हतेचे प्रमाणपत्र वाचक / दर्शक देतात. वाचकसंख्या आणि दर्शकसंख्या यांचा आलेख चढता आहे. त्यामुळेच विश्वाससंपादन करून महाबुलेटीन न्यूज आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेऊन आहे. तीन वर्षभराच्या कालावधीत विविधस्पर्शी बातम्या आणि लेख वाचकांपर्यंत पोहचवल्या. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, गुन्हेगारी, आरोग्य, कोरोना, माहिती तंत्रज्ञान यासंदर्भातील वृत्तांकन जे झाले त्याबद्दल संबंधीत क्षेत्रातून प्रोत्साहित करणाऱ्या प्रतिक्रिया उमटल्या.

तीन वर्षाच्या वाटचालीचे सिंहावलोकन करताना आकडेच पुरेसे बोलतात. प्रतिसाद पहाता जबाबदारी वाढत आहे. महाबुलेटीन न्यूज तीनवर्षांच्या पूर्तीवर वस्तुनिष्ठ, सडेतोड, रियल टाइम न्यूज, विविधस्पर्शी आणि सर्वदूर बातम्यांचे अभिवचन देत आहे. आपले सर्वांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून महाबुलेटीन न्यूजला दिलेल्या पसंतीबद्दल ऋण निश्चित आहेत. तसेच आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल सर्वांचे आभार… चौथ्या वर्षात पदार्पण करताना तुमचे प्रेम व आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहोत, हीच सदिच्छा…

हनुमंत देवकर : मुख्य संपादक

शिवाजी आतकरी : संपादक

0000

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.