अध्यात्मिक

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल… पहा कोणते आहेत पर्यायी मार्ग..

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदलपहा कोणते आहेत पर्यायी मार्ग...

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पुणेसासवडलोणंद मार्गे पंढरपूर अशी जाते. तर संत तुकाराम महाराज पालखी पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती इंदापूर अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल आवश्यक असल्याने संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १४  ते १८ जून या कालावधीत तर श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १५ जून ते २४ जुन या कालावधीत पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या गावांमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले आहेत. तसेच या कालावधीसाठी वाहतूक नियमनाचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गातील वाहतुकीत बदल :-

पुणे ते सासवड (सासवड मुक्काम) – १४ जूनच्या रात्री वाजल्यापासून ते १६ जूनच्या रात्री १२  वाजेपर्यंत पुण्याकडून सासवडकडे दिवेघाट बोपदेव घाट मार्गे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. ही वाहतूक खडीमशीन चौककात्रजकापूरहोळमार्गे सुरू राहील. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडेखेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.

सासवड ते जेजुरी (जेजुरी मुक्कम) जेजुरी ते वाल्हे (वाल्हे मुक्काम) – १६ जून रात्री वाजेपासून ते १७ जून रात्री १२ या कालावधीत पुणे येथून सासवडजेजुरीवाल्हेनिराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी झेंडेवाडीपारगाव-मेमाणेसुपेमोरगांवनीरा या मार्गाचा वापर करावा.

वाल्हे ते लोणंद (लोणंद मुक्कम)- १८ जून रोजी पहाटे ते सायंकाळी   वाजेपर्यंत पुणे येथून सासवडजेजुरीवाल्हेनिराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी सासवडजेजुरीमोरगांव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.

लोणंद येथून पुढे फलटण मार्गे१६  ते १८ जून या कालावधीत फलटणलोणंद येथून पुणे येथे येणारी तसेच पुणे येथून फलटणलोणंदकडे जाणारी वाहतुक शिरवळ मार्गे जाईल.

श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मार्ग :-

लोणी काळभोर ते यवत (यवत मुक्काम)- १५ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहनेवाघोलीकेसनंदराहूपारगांवचौफुला या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुण्याकडे येणारी वाहतूक चौफुलापारगांवराहूकेसनंदवाघोली या मार्गाचा वापर करतील.

यवत ते वरवंड ( वरवंड मुक्कम)- १६ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने थेऊर फाटाकेसनंदराहूपारगांवन्हावरेकाष्टीदौंडकुरकुंभ या मार्गे जातील. सोलापूर बाजूकडून येणारी वाहने कुरकुंभदौंडकाष्टीन्हावरेपारगांवराहू-केसनंदवाघोली या मार्गाचा वापर करतील.

वरवंड ते उंडवडी, ता. बारामती (मुक्काम उंडवडी)- १७ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत पुणे बाजूकडून सोलापूरकडे जाणारी वाहने चौफुलापारगांवन्हावरेकाष्टीदौंडकुरकुंभ या मार्गाचा वापर करतील. तसेच सोलापूर बाजूकडून पुणे बाजूकडे येणारी वाहतूक कुरकुंभदौंडकाष्टीन्हावरेपारगांवचौफुलावाघोलीपुणे या मार्गाचा वापर करतील.

उंडवडी ते बारामती (बारामती मुक्काम)- १८ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत बारामती ते पाटस बारामती ते दौंड हे रस्ते बंद राहतील. ही वाहतूक भिगवन मार्गे बारामतीला जाईल. बारामतीकडून येताना भिगवन मार्गे सोलापूरपुणे महामार्गावर येईल.

बारामती ते सणसर (सणसर मुक्काम) – १९ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत जंक्शन ते बारामती हा रस्ता वाहतुकी साठी बंद राहील. वालचंदनगर इंदापुरकडून येणारी वाहतूक जंक्शन येथून कळस मार्गे बारामतीआष्टी वळविण्यात येईल.  बारामतीकडून येताना भिगवन कळस जंक्शन कडे जाईल.

सणसर ते अंथुर्णे (अंथुर्णे मुक्काम) तसेच अंथुर्णे ते निमगांव केतकी (निमगांव केतकी मुक्काम)- २०  जून रोजी पहाटे ते २१ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत २१ जून रोजी पहाटे ते २२ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बारामतीकडून इंदापूरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने बारामतीकळंबबावडाइंदापूर या मार्गे किंवा बारामतीभिगवणइंदापूर या मार्गे जातील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने इंदापूरबावडाकळंबबारामती या मार्गे किंवा इंदापूरभिगवणबारामती या मार्गे जातील.

निमगाव केतकी ते इंदापूर (इंदापूर मुक्काम) २२ जून रोजी पहाटे   ते रात्री १२ वाजेपर्यंत निमगाव केतकीकडून इंदापूरकडे जाणारी वाहतूक बंद राहील. इंदापूरकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक लोणी देवकरकळसजंक्शन मार्गे किंवा लोणीदेवकरभिगवणमार्गे बारामतीकडे जातील.

इंदापूर२३ जून रोजी पहाटे ते रात्री वाजेपर्यंत अकलूजकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक ही अकलूजबावडानातेपुते मार्गे जातील. अकलुजकडून बारामती पुण्याकडे जाण्याकरीता इंदापूर मुख्य हायवेचा वापर करावा. इंदापूर शहरातील जुना पुणे सोलापूरमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल. त्यावरील वाहतूक मालोजीराजे चौक ते महात्मा फुले चौक अशी बायपासने वळविण्यात येईल.

इंदापूर ते सराटी (सराटी मुक्काम)- २४ जून रोजी पहाटे ते रात्री १२ वाजेपर्यंत २५ जून रोजी पहाटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदापूर ते अकलूज रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. या मार्गावरील वाहतूक इंदापूरहिंगणगांवटेंभुर्णीगणेशगावमाळीनगरअकलूज या मार्गे जातील. तसेच अकलूज ते इंदापूर या मार्गावरील वाहने अकलूजनातेपुतेवालचंदनगरजंक्शनभिगवण या मार्गे जातील.

0000

MahaBulletin Team

Recent Posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल 20 रुपये वाढ करण्याचा निर्णय केंद्राची मान्यता आणि नाफेड यंत्रणेमार्फत उपलब्ध होणाऱ्या 10 वस्तूंची विक्री शिधावाटप दूकानातून करण्यास परवानगी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक कार्यालय असावे, अशा पद्धतीने मुंबई, ठाण्यातील शिधावाटप यंत्रणेची पुनर्रचना – उपमुख्यमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अजित पवार

महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…

4 days ago

व्याजाच्या पैशांच्या वादातून हत्या..! बारामती-सोरटेवाडी हत्या प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी केलं जेरबंद

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…

2 weeks ago

पत्रकारांनो सावधान.. तुम्हाला 250 कोटींचा दंड होऊ शकतो

मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…

3 weeks ago

महिलांना व्यवसायासाठी मिळणार 3 लाख रुपये बिनव्याजी कर्ज! येथे अर्ज करा Small Business Loan Apply

महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…

4 weeks ago

दुबईत खेडच्या मराठी तरुणाची व्यवसायात भरारी…

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…

4 weeks ago

This website uses cookies.