महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर ( प्रतिनिधी ) : दावडी (जाधवदरा) (ता. खेड) येथील श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान (रजि.) च्या अध्यक्षपदी पत्रकार प्रभाकर जाधव, उपाध्यक्षपदी मारुती जाधव, तर सचिवपदी बाजीराव जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष बाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते सदर निवडी पार पडल्या.
(दि. १४) जानेवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर श्री दत्तगुरु सेवा प्रतिष्ठान चे मावळते अध्यक्ष बाजीराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन प्रतिष्ठानचा मागील कार्याचा आढावा घेऊन नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली.
सदर बैठकीत प्रतिष्ठानची कार्यकारीणी सर्वानुमते निवडण्यात आली ती पुढीलप्रमाणे :- अध्यक्ष – पत्रकार प्रभाकर शंकरराव जाधव, उपाध्यक्ष – मारुती बाळासाहेब जाधव, साहेबराव गोविंद जाधव, कार्याध्यक्ष – रामदास खंडूजी जाधव, सचिव – बाजीराव निवृत्ती जाधव, सहसचिव – संतोष देवराम जाधव, खजिनदार – नवनाथ गणपत जाधव, व्यवस्थापक – बाळासाहेब बाबुराव जाधव, सहव्यवस्थापक – गणेश रामदास जाधव, प्रसिद्धी प्रमुख – शांताराम सोपान जाधव, सदस्य – बाळासाहेब सहादु जाधव, सदस्य – कोंडीभाऊ बाबुराव जाधव, मुकुंद बबन जाधव
पुढील आगामी काळात प्रतिष्ठानच्या माध्यमातून मंदिर आणि मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून काम केले जाईल. यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. अशी भावना नूतन अध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी मनोगतातून व्यक्त केली.
—
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.