महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : मेधावीन फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शिबीर सोमवार ते शनिवार ( दि.१८ ते २३ जानेवारी ) या कालावधीत सकाळी १० ते ५ यावेळेत कडोलकर कॉलनी येथील लायन्स क्लब विवेकानंद हॉलमध्ये
घेण्यात येणार आहे. वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे असून हे प्रशिक्षण विनामूल्य आहे, अशी माहिती मेधावीन फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मा. उपनगराध्यक्षा वैशाली प्रमोद दाभाडे यांनी दिली.
व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण शिबिरात तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रशिक्षण शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैशाली दाभाडे यांनी केले आहे. या शिबिरासाठी तळेगाव लायन्स क्लबने हॉल उपलब्ध करून दिला असून अधिक माहितीसाठी तळेगाव स्टेशन चौक येथील विनायक मेडिकल ( मो. नं. 9850581407 ) या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
——
रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…
शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…
मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…
सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…
This website uses cookies.