महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : चाकण येथील शिवसेनेचे प्रथम शाखा प्रमुख, माजी जिल्हा उपप्रमुख व कट्टर शिवसैनिक सुरेशशेठ शंकरराव मांजरे ( वय ६० ) यांचे रविवारी ( दि. १३ सप्टेंबर ) दुःखद निधन झाले.
१९८० च्या दशकात मुंबई नंतर महाराष्ट्रातील शिवसेनेची पहिली शाखा चाकण येथे स्थापन करणारे ते शहरातील पहिले शिवसैनिक होते. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यात शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन सेनेचे नेते छगन भुजबळ यांच्या सभांचे आयोजन त्यांनी केले होते. त्यावेळी चित्रपट अभिनेते व शिवसैनिक स्व. दादा कोंडके यांना निमंत्रित करून चाकण शहरातून त्यांची मिरवणूक काढली होती. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन त्यांनी शिस्तबद्ध व मोठ्या थाटात केले होते. त्यामुळे ते शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून पुणे जिल्ह्याला परिचित होते.
त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्योजक अरुणशेठ मांजरे, माजी जिल्हा परिषद सदस्य व राजगुरूनगर बँकेचे संचालक किरणशेठ मांजरे, उद्योजक बाळासाहेब व मनोजशेठ मांजरे यांचे ते बंधू होत.
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…
महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…
This website uses cookies.