महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : “आपल्याला १९४७ साली जे स्वातंत्र्य मिळाले ती भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले” असे कंगनाने एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे, असे वक्तव्य करून कंगनाने देशाचा व देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे कंगना राणावतला मिळालेला पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. तिच्या या बेताल वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रव्यापी उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी चाकण पोलीस ठाण्यासमोर निषेध करून निवेदन देण्यात आले.
कंगणाच्या बेताल वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्र व्यापी उग्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन यावेळी देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख रामदास (आबा) धनवटे, स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष नितीनशेठ गोरे, महिला आघाडी तालुका प्रमुख नंदाताई कड, उपतालुका प्रमुख किरण गवारी, ग्रा.सं.कक्ष जिल्हा प्रमुख लक्ष्मण जाधव, जेष्ठ शिवसैनिक पांडुरंग (बाप्पू) गोरे, शेखर (नाना) पिंगळे, शाखाप्रमुख शाम राक्षे, अशोक सोनवणे, मा.नगराध्यक्ष मंगलताई गोरे, शहर प्रमुख मंगलाताई हुंडारे, उपशहर प्रमुख संगीता कंकाळे, विभाग प्रमुख कविताताई कर्पे, संगिताताई फपाळ, उपविभाग प्रमुख अंजली डोंगरे, शाखाप्रमुख लताताई धाडगे, प्रभावती साळुंके, छाया आहेर, मीरा पडुळे, लक्ष्मीताई कड, सुनिता पवार, ज्योती कड, मनिषा सावंत, सोनल कड आदी उपस्थित होते.
0000
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.