महाबुलेटीन न्यूज l आनंद कांबळे
जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघात प्रचाराचा नारळ फुटला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) या दोन्ही विरोधी नेत्यांची किल्ले शिवनेरीवर (Shivneri) भेट झाली. त्यांनी चक्क एकमेकांना हस्तांदोलन करून खेळीमेळीत प्रचार करूया असा संदेश नागरिकांना दिला. या भेटी दरम्यानच्या प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
आज तिथिनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol kolhe) आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adharao Patil) हे शिवनेरी किल्ल्यावर आले होते, शिवनेरीच्या पायरीवर नतमस्तक होऊन दोघांकडून प्रचार सुरू करण्यात आला. त्यावेळी दोघांची समोरा समोर भेट झाली. यावेळी खा. अमोल कोल्हे यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे चरण स्पर्श करत आशिर्वाद घेतला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून याची चर्चा होत आहे.
माध्यमांशी बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे, समोर वयस्कर व्यक्ती आली मग ती निवडणूकीच्या रंगणात आहे किंवा इतर ठिकाणी. राजकारणातील सुसंकृतता प्रत्येकाने जपली पाहिजे, असेही कोल्हे म्हणाले. तर आढळराव पाटील म्हणाले की, आता हे ठिक आहे, हि प्रथा आहे हिंदु धर्मामध्ये जेष्ठाच्या पायाला स्पर्श करण्याचा. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या व मी त्यांना शुभेच्छा दिल्या, असे ते म्हणाले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.