पुणे जिल्हा

शिवनेर भूषण पुरस्कार २०२१ व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २०२१ जाहीर

शिवनेर भूषण पुरस्कार २०२१ व छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार २०२१ जाहीर
संकेत भोंडवे

 

 

डॉ.सदानंद राऊत

 

महाबुलेटीन न्यूज : आनंद कांबळे
जुन्नर : “कोरोना पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी याबाबत महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढले असून किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुका रद्द केल्या आहेत. किल्ले शिवनेरीवर होणारा शिवजयंती सोहळा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना दिसण्याकरीता प्रशासनाने तयारी केली आहे. मागील वर्षी शिवजयंती सोहळा दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी विकासासाठी जाहीर केलेला निधी मंजूर करण्यासाठी मी प्रत्यक्ष किल्ले शिवनेरीची सविस्तर पाहणी करून भरीव निधी मिळावा म्हणून २३ कोटी ९० लाख रूपयांचा आराखडा तयार करून सादर केला त्यास प्रत्यक्ष मंजुरी मिळालेली आहे,” असे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष श्याम पांडे, पं.स. सभापती विशाल तांबे, नगरसेवक भाऊसाहेब कुंभार, राष्ट्रवादी जुन्नर शहर अध्यक्ष धनराज खोत, भाऊ देवाडे,बाळासाहेब सदाकाळ आदी उपस्थित होते.

यावर्षीचा महाराष्ट्र शासनाने अधिकृत केलेला व शिवनेरी परिसर विकास मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार वल्लभ बेनके यांनी सुरू केलेला समाजसेवेचे कार्यास वाहून घेतलेले राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार खेड तालुक्यातील निमगांव दावडीचे सुपुत्र, आयएएस अधिकारी संकेत एस. भोंडवे यांना जाहीर झाला आहे. तसेच जुन्नर तालुकास्तरीय शिवनेरी भूषण पुरस्कार उंब्रज गावचे डॉक्टर सदानंद राऊत यांना जाहीर झाला असल्याबाबतची अधिकृत घोषणा बेनके यांनी केली.

मानपत्र, शिवजन्म वास्तू प्रतिकृती असलेले स्मृतीचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप असल्याचे सांगण्यात आले. शिवजयंती उत्सव सर्व शिवभक्तांनी समन्वयाची भुमिका तसेच आरोग्याची काळजी घेवून व शिस्तीचे पालन करून व प्रशासनास सहकार्य करून साजरा करावा, असे आवाहन अतुल बेनके यांनी केले आहे.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

1 month ago

ज्ञानेश्वरी काव्यार्थ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर चाकण : युगंधर पब्लिकेशन हाऊस, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाकण,…

1 month ago

स्वच्छ, हरित व सुरक्षित वारीसाठी सूक्ष्म नियोजन करा-विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्तांकडून पालखी सोहळा पूर्वतयारीचा आढावा

महाबुलेटीन न्यूज l प्रसन्नकुमार देवकर पुणे, दि.१६ : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून…

1 month ago

चाकण येथे कामगार महिलेवर बलात्कार, आरोपीस १२ तासात अटक

महाबुलेटीन न्यूज चाकण : चाकण जवळील मेदनकरवाडी येथील बालाजीनगरमध्ये १३ मे रोजी कामगार महिलेवर झालेल्या…

1 month ago

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

महाबुलेटीन न्यूज : Kedarnath Char Dham Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षेत केदारनाथ…

2 months ago

This website uses cookies.