महाबुलेटीन न्यूज l प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील शिरगाव येथील सरपंचाचा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला. शिरगाव येथील साई मंदिराच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शनिवारी (दि. १) रात्री सव्वानऊच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे मावळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) असे खून झालेल्या सरपंचाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण गोपाळे सरपंचपदी विजयी झाले. गोपाळे यांचा प्लाटिंगचा व्यवसाय होता. या वादातूनच वाद असल्याचे सांगितले जात आहे.
प्रवीण गोपाळे शनिवारी रात्री दुचाकीवरून शिरगाव येथील साई मंदिरासमोर आले होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गोंधळ उडाला. नागरिकांचा आरडाओरडा झाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले.
कोयत्याचे वार चुकविण्यासाठी गोपाळे जीव वाचवण्यासाठी पळत होते. यावेळी मारेकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करून चेहऱ्यावर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गोपाळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मारेकरी दुचाकीवरून पळून गेले. त्यांना जखमी अवस्थेत पवना हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शिरगाव-परंदवडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0000
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.