■ वाढदिवसाला केक ऐवजी फळं कापून शेतकऱ्यांना मदत करा.
● दिसायला छोटा आहे, परंतु क्रांतिकारी विचार आहे….
महाबुलेटीन न्यूज : केक ऐवजी कलिंगड कापा, खरबूज कापा, सफरचंद, पेरू, पपई, सीताफळ, आंबा या देशी फळांचा वाढदिवसाच्या निमित्ताने केक सारखाच वापर करा. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला बाजार वाढेल. जर शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर आपल्या वाढदिवसा निमित्ताने एखाद्या शेतकऱ्याचं फळ खरेदी करून त्याला मदत होते का, हा पण याच्यात विचार आपल्या कृतीतून उतरवला तर शेतकऱ्यांच्या मालाला एक चांगला दर भेटेल.
कारण दररोज असंख्य लोकांचे वाढदिवस असतात आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने केकची किंमत दोनशे ते पाचशे रुपये असते आणि यापैकी एकही फळ दोनशे रुपये किलो नाही. जर आपण वाढदिवसाला केक ऐवजी फळांचा वापर केला, तर निश्चितच आपल्या आरोग्याला सुद्धा याचा फायदा आहे. केक मध्ये वापरले जाणारे बरेच पदार्थ वेगवेगळ्या रासायनिक मिश्रणापासून तयार केलेले असतात. आज आपण अगोदरच त्रस्त झालो आहोत, उत्तम आहार मिळत नाही, त्यातून असे पाश्चात्य देशातल्या संस्कृतीचा वापर आपण जर केला, तर त्याचे आपल्या आरोग्यावर निच्छितच दुष्परिणाम होणार आहे. तर आपण वाढदिवसाला केक ऐवजी देशी फळांचा वापर केल्यास आपली संस्कृती जपली जाईल आणि महाराष्ट्र तसेच देशातील शेतकऱ्यांविषयी येणाऱ्या तरुण पिढीच्या मनात आदर व आस्था निर्माण होईल.
शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात देखील असंख्य लोक वाढदिवसानिमित्त केक वरती मोठ्याप्रमाणावर खर्च करतात, त्यानंतर तोच केक तोंडाला लावतात, फेकून देतात. परंतु आपण कापलेला केक आपल्या वाढदिवसानिमित्त हा जर फळाचा असेल, तर आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेले नातेवाईक, मित्र किंवा आप्तेष्ट त्या फळाच्या केकची चव आनंदाने चाखू शकतील. आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उत्तम आहार तुमच्या माध्यमातून मिळू शकतो हा पण आपण कुठेतरी विचार केला पाहिजे.
—–
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.