आंदोलन

शेतकरी आंदोलन : स्वतःवर गोळी झाडून संत बाबा रामसिंह यांची आत्महत्या… सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये केलं नमूद

 

महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्यासाठी गेल्या २० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान यात सहभागी असलेले संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. बाबा राम सिंह हे करनालमधील रहिवासी होती. त्यांच्या मृत्यूनंतर एक सुसाईड नोटदेखील समोर आली आहे. सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

त्यांच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटनुसार संत बाबा राम सिंह यांनी शेतकऱ्यांवर सरकारकडून सुरू असेलेल्या अत्याचाराविरोधात आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे. बाबा राम सिंह हे एक शेतकरी होते आणि ते हरयाणा एसजीपीसीचे नेतेदेखील होते. “मी शेतकऱ्यांचं दु:ख पाहिलं आहे. तो आज आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मला फार वेदना झाल्या, सरकार न्याय देत नाही. हा अन्याय आहे. अन्याय करणं पाप आहे आणि अन्याय सहन करणंही पाप आहे,” असं त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.

“कोणीही शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात काही केलं नाही. अनेकांनी त्यांना मिळालेले सन्मान परत केले. हा अत्याचाराविरोधातील आवाज आहे. वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतेह,” असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

यापूर्वी मंगळवारीदेखील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री उशीरा पटियाला जिल्ह्याच्या सफेद गावात एक अपघात झाला होता. त्यामध्ये दिल्लीतील शेतकरी आंदोलनातून परतत असेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 19 Mar 2026

बुधवार, १८ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ पुणे जिल्हा परिषद…

39 minutes ago

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

1 day ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

This website uses cookies.