गुन्हेगारी

जेवणात मिठ जास्त झालेचे कारणावरुन हॉटेल चालकाने केला आचाऱ्याचा खून, शेलपिंपळगाव येथील घटना, दिड महिन्यापूर्वीकेलेल्या खुनातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनने केले गजाआड

जेवणात मिठ जास्त झालेचे कारणावरुन हॉटेल चालकाने केला आचाऱ्याचा खून, शेलपिंपळगाव येथील घटना, दिड महिन्यापूर्वीकेलेल्या खुनातील आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनने केले गजाआड

महाबुलेटीन न्यूज

चाकण : जेवणात मिठ जास्त झालेचे कारणावरुन शेलपिंपळगाव ( ता. खेड ) येथे ओंकार ढाबा या हॉटेलच्या चालकाने परप्रांतीयआचाऱ्याचा २६ ऑक्टोबर रोजी खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तब्बल दिड महिन्यानी या खुनाची उकल करून खुनातील आरोपींना पिंपरीचिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस पथकाने बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसेनजीत गोराई ( वय ३५ वर्षे रा. जिल्हा २४ परगना, पश्चिम बंगाल ) असे खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल चालक ओंकार अण्णाराव केंद्रे ( वय२१ वर्षे ) त्याचा लहान भाऊ कैलास अण्णाराव केंद्रे ( वय १९ वर्षे, दोघेही रा. ओंकार ढाबा, चाकणशिक्रापुर रोड, शेलपिंपळगाव, ता.खेड, जि.पुणे मुळ रा. दिग्रस, ता. कंधार, जि. नांदेड ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी कि, पिंपरीचिंचवड सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पद्माकर घनवट यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली कि, चाकण पोलीस ठाणे हद्दीतील चाकणशिक्रापुर रोड, शेलपिंपळगाव येथे ओंकार ढाबा हॉटेलच्या चालकाने एक महिण्यापुर्वी एका परराज्यातील कामगाराचा खुन केला असुन त्याने त्याची मयत बॉडी कोठेतरी फेकुन विल्हेवाट लावलीआहे.

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना कळवुन खातरजमा करणे कामी गुन्हे शाखा युनिट चे पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड यांना आदेशीत केल्यानंतर त्यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले अंमलदार यांनी वेशांतर करुन ओंकार ढाबा येथे जावुन तेथील ढाबा चालक कामगारांची माहीती काढुन त्यांचे फोटो प्राप्त केले. प्राप्त झालेल्या माहीतीचे अनुषंगाने आज बातमीदाराकडुन खात्री केल्यावर शस्त्रविरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख यांनी यातील संशयीतांना ताब्यात घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशीत केले.

त्यानुसार शस्त्र विरोधी पथकाचे .पो.नि. देशमुख पथक तसेच गुन्हे शाखा युनिट चे पो.उप.नि. चामले पथक यांनी शेलपिंपळगाव येथुन संशयीत आरोपी ढाबा चालक ओंकार त्याचा भाऊ कैलास यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्हे शाखा युनिटयेथे आणुन कौशल्यपूर्ण तपास केला असता निष्पन्न झाले कि, वर नमुद दोघांनी मिळुन त्यांचे ढाब्यांवर ०७ दिवसांपुर्वीच आचारी काम करण्यास आलेला इसम नामे प्रसेनजीत गोराई ( वय ३५ वर्षे रा. जिल्हा २४ परगना, पश्चिम बंगाल ) यास त्यांचे जेवनात मिठ जास्त झाल्याचे कारणावरुन झालेल्या वादावादीतुन दि. २६/१०/२०२२ रोजी रात्री दरम्यान ओंकार ढाबा, चाकणशिक्रापुर रोड, शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे येथे त्याचे डोळयामध्ये मिरची पावडर टाकुन त्यास लाकडी दांडके, लोखंडी रॉड वायरने मारहाण करुन जिवे ठार मारले त्याची मयत बॉडी तशीच दिवसभर ढाब्यावरील  आतल्या खोलीत लपवुन ठेवली. दि.२८/१०/२०२२ रोजी पहाटे सदर मयत बॉडी वैष्णवी ढाबा, शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे चे मागे असलेल्या डोंगराळ भागातील एका ओढयात फेकुन विल्हेवाट लावली.

पुढे केलेल्या तपासात चाकण पोलीस ठाणेचे अभिलेखावर दि. ०६/११/२०२२ रोजी अकस्मात मयत रजि. क्र. ३३५/२०२२सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे नोंद असलेल्या प्रकरणातील मयत बॉडी ही मयत प्रसेनजीत गोराई ( वय ३५ वर्षे रा. जिल्हा २४ परगना, पश्चिम बंगाल ) याची असल्याचे निष्पन्न झाले. सदरचा उघडकिस आणुन दोन्ही आरोपींना चाकण पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास चाकण पोलीस स्टेशन करत आहे.

सदर प्रकार हा त्यांनी ढाव्यावर कामास असलेल्या अन्य परराज्यातील कामगारापुढेच केला होता. परंतु त्यांनी त्यांना सुध्दा जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याने त्यांनी तो प्रकार कोणासही सांगत घाबरुन ते तेथेच काम करत होते.

सदर किचकट गुन्हयाची उकल पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्नागोरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, .पो.नि. अंबरीश देशमुख ( शस्त्रविरोधी पथक ), पो. उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस हवालदार विठ्ठल सानप, यदु आढारी, सचिन मोरे, ऋषिकेश भोसुरे, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, योगेश्वर कोळेकर, सुधीर दांगट, निखिल फापाळे, समीर काळे, रामदास मिरगळ, सागर जैनक, महेश भालचिम, अंकुश लांडे, शशिकांत नांगरे यांनी तसेच शस्त्रविरोधी पथकाचे सहा. फौजदार शाम शिंदे, एल. के. वाव्हळे, पोलीस हवालदार प्रितम वाघ, वसिम शेख, शेळके यांचे पथकाने केली आहे. तांत्रीक विश्लेषण शाखा पोलीस हवालदार माळी यांनी तपास पथकास विषेश सहकार्य केले0000

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.