पुणे जिल्हा

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे बाबत माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांची चाकण नगरपरिषदेकडे मागणी

शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे बाबत माजी उपसरपंच कालिदास वाडेकर यांची चाकण नगरपरिषदेकडे मागणी

महाबुलेटीन न्यूज । हनुमंत देवकर
चाकण : चाकण शहरातील महात्मा फुले नगर मधील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करणे बाबत कालिदास वाडेकर यांनी चाकण नगरपरिषदेकडे मागणी केली आहे.

चाकण शहरातील जमीन गट नंबर ०२ वरील महात्मा फुले नगर झोपडपट्टी ही सन १९७०-७२ पासून वास्तव्यास आहे. त्यामध्ये असणारी सुमारे ३००-३५० घरे ही अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील आहेत. सदर लोकांना नागरी सुविधा मिळण्याकामी वेळोवेळी महात्मा फुले नगर झोपडपट्टी रहिवाशांच्या व आर.पी.आय च्या वतीने ग्रामपंचायती पासून ते आज रोजी चाकण नगरपरिषदला वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे.

तसेच ४ वर्षांपूर्वी दिनांक १०/१०/२०१७ रोजी महात्मा फुले नगर, आर.पी.आय च्या वतीने ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यातील प्रमुख मागण्या १) गट नंबर ०२ हे अधिकृत घोषित करावे, २) सर्वेक्षण करणे, ३) रहिवाशी यांना फोटो पास, ७/१२ तसेच ८ अ चे उतारे मिळावे.

शासन निर्णय क्र : एम यू एन २०१८/प्र. क्र.१९७/नवि-१८, दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या सर्वांसाठी घरे २०२२ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे बाबत…

या शासन निर्णयानुसार शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेल्या लोकांना अतिक्रमण नियमित करून सदरहू लोकांना ७/१२ उतारा व ८ अ उतारा देण्याची तरतूद आहे, त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिक्रमित जागेवरील अतिक्रमणे नियमित करून तेथील रहिवाशांना ७/१२ व ८ अ उतारा देण्यात आलेले आहेत, परंतु चाकण मधील महात्मा फुले नगर या अतिक्रमित जागेचे सर्वेक्षण होऊन प्रारूप यादी तयार करून त्याचे जाहीर प्रकटन होऊन हरकती व सुनावणीच्या प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा रहिवासी धारकांना या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. म्हणून कालिदासदादा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महात्मा फुले नगर विकास मंच्याच्या वतीने वरील मागणीसाठी दिनांक ०८/१०/२०२१ रोजी नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले. या पत्राच्या आधारे चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याशी वरील मागण्यांवर चर्चा करण्यात आली.

चाकणचे माजी उपसरपंच कालिदासदादा वाडेकर यांनी महात्मा फुले नगरची वस्तुस्थिती मुख्याधिकारी यांच्या समोर मांडली व त्यानुसार महात्मा फुले नगर येथील रहिवाश्यांना ७/१२ व ८ अ उतारा लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. महात्मा फुले नगर विकास मंच पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी कामठे यांना महात्मा फुले नगरच्या जागे संदर्भात काही प्रश्न विचारले असता, २०१८ पासून जागेचे सर्वच प्रश्न प्रलंबित असल्याचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांनी सांगितले. प्रलंबित असलेले सातबारा व आठ अ उतारा देण्याचा प्रस्ताव त्वरित वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याचे आश्वासन महात्मा फुले नगर विकास मंचाच्या शिष्टमंडळाला दिले.

यावेळी चंद्रकांत बचुटे, अँड. अमर साळवे, युवराज गालफाडे, संदेश झाडे, जीवन सरवदे, बाळू गायकवाड, विलास कुचेकर, सिद्धीक शेख, नभी शेख, भरत बचुटे, भरत कुचेकर, अशोक सोनवणे, काशीनाथ बनसोडे, कैलास कुचेकर, किरण खंडागळे, बाळू प्रधान, आकाश गालफाडे आदी उपस्थित होते. गौतम वाव्हळ यांनी सर्वांचे आभार मानले.
००००

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.