महाबुलेटीन न्यूज
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ९९ व्या जयंती निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र वाचन प्रेरणा दिन साजरा करतो. या निमित्त महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करून प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.
भारतरत्न डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांचे जीवन व कार्य या विषयावर व्याख्याते शिवचरित्रकार, जिल्हा सत्र न्यायालय पुणेचे ॲड. नागेश जायभाय यांनी हृदयस्पर्शी व्याख्यान देवून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मयूर ढमाले यांचे मार्गदर्शन झाले. ऑनलाईन पद्धतीने दीड तास झूम ॲपवर या कार्यक्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.
यावेळी वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविण्यामागील हेतू व उद्दिष्टे डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी स्पष्ट केली. ॲड. नागेश जायभाये यांनी सविस्तरपणे डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य व चरित्र याबाबत मार्मिक शब्दात प्रभावीपणे मांडणी केली. ती अतिशय प्रभावी व प्रेरणादायी होती. प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार, तत्त्वज्ञान उपयुक्त असून विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे आहे. त्यांचा त्याग, मेहनत, सेवा व कार्य सर्व विद्यार्थ्यांना वेध लावणारे आहे. विद्यार्थ्यांचा या व्याख्यानास प्रतिसाद मिळाला. सांस्कृतिक विभागातील सर्व सदस्य व सर्व प्राध्यापकांचे चांगले सहकार्य मिळाले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले. प्रा. परमेश्वर भतासे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
००००
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.