महाबुलेटीन न्यूज : अविनाश घोलप
आंबेगाव तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागातील न्हावेड जिल्हा परिषद शाळेच्या तंत्रस्नेही मुख्याध्यापिका वैशाली भालेराव यांनी लोकसहभातून दोन ॲन्ड्राईड टिव्ही, टॅब, लॅपटॉप तर त्यासाठी लागणारे इयत्ता निहाय सॉफ्टवेअर रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष बाळासाहेब गिलबिले यांच्या माध्यमातून मिळविले.
ऑनलाईन शिक्षण घरीच सुरू झाल्यामुळे पालक सुध्दा आनंदी असुन स्वतः विद्यार्थ्यांसमवेत शिक्षणाचा आनंद घेत आहेत. ‘शाळा बंद, शिक्षण चालू’ या उपक्रमासाठी वरील साहित्य दत्तात्रय केंगले (आयकर अधिकारी), राजश्री आंबटकर (आयकर इन्स्पेक्टर), चंद्रशेखर लावंड (मॅनेजर), प्रमोद नहार (सी.ए) यांनी महत्वपूर्ण आर्थिक योगदान दिले.
या ई-लर्निंग सॉफ्टवेअर साहित्य प्रदान सोहळ्यास आत्माराम जगदाळे, अशोक मावळे, संतोष गवारी, राजू भालेराव, ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तसेच काळू गारे, सखाराम असवले, देमा रढे ,दत्ता आंबवणे, धावजी आसवले आदी उपस्थित होते. कोरोना काळात १ ली ते १० वी च्या मुलांना मोफत शिक्षण देणारे बाबुराव आंबवणे, गजानन असवले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर उपशिक्षक संतोष आंबवणे यांनी आभार मानले.
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.