उदघाटन/भूमिपूजन

सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी ही एक आदर्श पतसंस्था : डॉ. अमोल कोल्हे

 

महाबुलेटीन न्यूज
नारायणगाव : सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी लि. मुंबई यांच्या नारायणगाव येथील शाखेचे व विश्रामधामचे उदघाटन शिरूर लोकसभा मतदार  संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटीचे पालक संचालक सखाराम डोंगरे यांनी दिली.

सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी लि. मुंबई ही संस्था महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक शाळा, कानिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आर्थिक पतपुरवठा करणारी एक अग्रगण्य पगारदार सहकारी पतसंस्था आहे. यांच्या राज्यभरात २२ शाखा असून आजपर्यंत ३४ हजार सभासद आहेत. मुंबई येथे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय आहे. 

नारायणगाव येथील शाखेच्या नूतन इमारतीचे व विश्रामधामचे उदघाटन करताना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सेकंडरी स्कुल्स एम्प्लॉईज को-ऑप. सोसायटी ही एक आदर्श पतसंस्था असून सेवेत असताना सभासदांचा मृत्यू झाल्यास मयत सभासदाचे कर्ज हे पूर्णपणे माफ केले जाते. हा निर्णय स्तुत्य आहे. 

याप्रसंगी राष्ट्रवादीचे युवास नेते अमित बेनके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज वाजगे, जेष्ठ संचालक जगन्नाथ पाटील, अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाचांगणे, सचिव किशोर पाटील, सहसचिव शिवाजी शेंडगे, खजिनदार सुरेश संकपाळ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी कोरोना काळात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेचे दिवंगत सभासद स्व. सुनील वाव्हळ यांच्या कुटुंबियांना एकतीस हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यानंतर इयत्ता १० वी तील ४० गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सी. ए. इंटमिजिएट परीक्षेत पुणे विभागातून प्रथम आलेल्या ऋतुजा घोलप व तिच्या पालकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात, “आई वडील हे आपल्या शिक्षणासाठी खूप परिश्रम घेत असतात. समाजामध्ये आपल्या आई वडिलांना ताठ मानेने जगता येईल असे प्रयत्न करा. खूप अभ्यास करा व चांगले यश संपादन करा.” अशा शुभेच्छा सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालक संचालक सखाराम डोंगरे यांनी केले, सूत्रसंचालन ताबाजी वाघदरे, मेहबूब काझी यांनी केले, तर आभार संचालक सुधाकर जगदाळे यांनी मानले.
—–

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 18 Mar 2026

मंगळवार, १७ मार्च २०२६ 📍 महाराष्ट्र आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा…

20 hours ago

MahaBulletin — 17 Mar 2026

पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा वाढता धोका पुन्हा एकदा समोर आला आहे, चाकण येथे एका 32…

2 days ago

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

8 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

8 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

9 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

9 months ago

This website uses cookies.