नारी शक्ती

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खराबवाडीत क्रांती महिला बचत गटाच्या वतीने उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार, आशा स्वयंसेविकांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव, शिक्षिकांचा सन्मान

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त खराबवाडीत क्रांती महिला बचत गटाच्या वतीने उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार, आशा स्वयंसेविकांचा कोविड योद्धा पुरस्काराने गौरव, शिक्षिकांचा सन्मान

महाबुलेटीन न्यूज
चाकण : “क्रांती म्हणजे बदल, आणि बदल असा असावा की, जे शक्य नाही ते शक्य करून दाखविणे म्हणजे क्रांती. आणि ज्योती म्हणजे दीप, एक ज्योत हजारो दिव्यांना पेटवू शकते, असा सावित्रीबाईंनी बदल घडविला. भारतात पुरुषप्रधान संस्कृती असतानाही सावित्रीबाईंनी महिला सक्षमीकरणाचे काम केले”, असे प्रतिपादन माजी उपसरपंच प्रकाशभाऊ खराबी यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांती महिला बचत गटाने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून खराबवाडी ( ता. खेड ) येथील क्रांती महिला बचत गटाच्या वतीने कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७ आशा स्वयं सेविकांना कोविड योद्धा पुरस्कार व ६ महिला बचत गटांना उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व महिला शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त आशा स्वयंसेविका
१. रेखा हरिष धाडगे 
२. मंदा संतोष कड
३. आशा गणेश जंबुकर
४. कविता नवनाथ म्हस्के
५. रंजना तानाजी लांडे
६. शुभांगी हनुमंत शिंदे
७. राजश्री उत्तम काळकुंड 

 

उत्कृष्ट महिला बचत गट पुरस्कार
१. सावित्रीबाई महिला बचत गट
२. तिरुपती महिला बचत गट
३. ज्ञानदीप महिला बचत गट
४. राजरत्न महिला बचत गट
५. भिमाई महिला बचत गट
६. दीक्षाभूमी महिला बचत गट

क्रांती महिला बचत गटाच्या सचिव मंगलताई देवकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी माजी उपसरपंच व नवमहाराष्ट्र विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाशभाऊ खराबी, माजी उपसरपंच व शाळा समिती सदस्य काळुराम केसवड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा माधुरी खराबी, पोलीस पाटील किरण किर्ते, सर्व शिक्षक वृंद, सर्व बचत गटाच्या महिला व विद्यार्थी उपस्थित होते. क्रांती बचत गटाच्या अध्यक्षा संगीताताई केसवड व मुख्यध्यापिका आशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. सर्व उपस्थितांना क्रांती बचत गटाच्या वतीने फळे वाटप करण्यात आले.

मंथन फाऊंडेशनच्या वतीने शाळेत मागील वर्षी घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सन्मानपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापिका आशा जाधव, संतोष भुते, सुनील मरभळ व सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. पत्रकार हनुमंत देवकर यांनी प्रास्ताविक केले. पूनम देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर महेंद्र गाडे यांनी आभार मानले.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.