महाबुलेटीन न्यूज
चाकण : नाणेकरवाडी ( ता. खेड ) येथील संतभारती ग्रंथालयाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सफाई कामगार, रिक्षा चालक अशा विविध क्षेत्रात सेवा करणाऱ्या महिलांचा पुष्पगुच्छ, ग्रंथ, भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी महिलांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी नाणेकरवाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पूनम नाणेकर, सफाई कामगार सरस्वती कांबळे, रत्ना सावंत, आशा वर्कर वर्षा नाणेकर, अर्चना नाणेकर, संगीता नाणेकर, अंगणवाडी सेविका वंदना जाधव, अलका नाणेकर, मनिषा फलके, कल्याणी नाणेकर, रिक्षा चालक नीता परसरामपुरिया, ग्रंथपाल सुवर्णा कोलते, उर्मिला जाधव आदी महिलांचा सन्मान करण्यात आला. ग्रंथालयाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे आभार मानले.
मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…
सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…
रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…
शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…
शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…
This website uses cookies.