राष्ट्रीय

Sansad Ratna Award 2023: संसदरत्न पुरस्काराची घोषणा; खासदार डॉ. अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान, माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार

Sansad Ratna Award 2023: संसदरत्न पुरस्काराची घोषणा; खासदार डॉ. अमोल कोल्हे, गोपाळ शेट्टी, हिना गावित आणि फौजिया खान यांचा सन्मान, माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार

महाबुलेटीन न्यूज : यंदाच्या संसदरत्न पुरस्कार 2023 ची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राच्या चार खासदारांचा समावेश आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी. के. रंगराजन यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, महाराष्ट्रातील लोकसभा खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे

लोकसभेतील खासदारांना नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये भाजपचे बिद्युत बरन महतो, डॉ सुकांत मुजुमदार, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, कुलदीपराय शर्मा, विजयकुमार गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे यांचा समावेश आहे. तर राज्यसभेत नामांकन मिळालेल्या नेत्यांमध्ये सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीचे फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा त्याचबरोबर लोकसभेच्या वित्त समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा आणि परिवहन पर्यटन आणि सांस्कृतीक समितीचे अध्यक्ष विजयसाई रेड्डी यांच्या नावाचाही यात समावेश आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती. लोकसभेचे ५४४ आणि राज्यसभेच्या २५४ खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेली विधेयके, चर्चेतील सहभाग आदी विविध मुद्यांचा विचार करून खासदारांना नामांकनदिले जातात. निवड झालेल्यांना २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.                                                        0000

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 21 Apr 2026

मंगळवार, २१ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🌾 निवृत्त…

1 day ago

MahaBulletin — 21 Apr 2026

सोमवार, २० एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 सिद्धेश्वर…

1 day ago

MahaBulletin — 20 Apr 2026

रविवार, १९ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 खेडमध्ये…

2 days ago

MahaBulletin — 20 Apr 2026

शनिवार, १८ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🏛️ आमदार…

2 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

शुक्रवार, १७ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

MahaBulletin — 18 Apr 2026

मंगळवार, १४ एप्रिल २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पतसंस्था…

4 days ago

This website uses cookies.