पुणे जिल्हा

सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा समाजरत्न पुरस्कार व शांतिदुत सेवारत्न पुरस्काराने गौरव

 

महाबुलेटीन न्यूज
चाकण : सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सोनवणे यांचा ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्य यांनी समाजरत्न पुरस्काराने तर शांतीदूत परिवारातर्फे शांतिदुत सेवारत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

ग्राहक कल्याण समितीचे संस्थापक तसेच पत्रकार सरंक्षण समिती नागपूर जिल्हा अध्यक्ष आणि नागपूर पोलीस आयुक्तालय शांतता समितीचे सदस्य,सामाजिक कार्यकर्ते डॉ. आशिष अटलोये यांनी बापूसाहेब सोनवणे यांच्या सामाजिक कामाची शिफारस केली.

तसेच सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या शांतिदुत परिवारातर्फे त्यांना शांतिदुत सेवारत्न पुरस्कार आणि पुणे जिल्हा कमिटीवर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करून सन्मान करण्यात आला. यावेळी बापूसाहेब सोनावणे यांनी रक्तदान केले. पुणे सायबर क्राइमच्या DCP भाग्यश्री नवटके, साखर आयुक्त शेखर गायकवाड, रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांच्या हस्ते पुणे येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला.

चाकण मध्ये राहणारे बापूसाहेब सोनवणे यांनी निसर्गमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख निर्माण केलीआहे.

शासनमान्य सर्पमित्र म्हणून गेली 20 वर्षे काम करत असताना त्यांनी अनेक तरुणांनाही प्रशिक्षण दिले आहे. ते पुणे जिल्हा आणि परिसरात साप, वन्य जीव वाचवण्याचे काम करत आहेत. त्यांचे छोटे बंधू डॉ. गोरक्षनाथ सोनवणे पशुवैद्यक असून त्यांनीही बापूंकडून साप पकडण्याचं प्रशिक्षण घेतले आणि ते ही साप पकडण्याबरोबरच जखमी वन्य जीवांवर उपचार करून त्यांना निसर्गात मुक्त करत आहेत. बापूसाहेब सोनवणे यांनी पाण्यातल्या योगावर कुशलता प्राप्त केली आहे. ते जमिनीवर योगा करतातच; परंतु पाण्यात कितीही काळ योगासन मुद्रेत राहतात. विशेष म्हणजे ते योगाचं विनामूल्य प्रशिक्षण देतात. आजपर्यंत त्यांनी हजारो साप वाचवले असून त्याचबरोबर अंध अपंगांना मदत करणे, सामाजिक दुर्लक्षित वंचित घटकांना मदत करणे, वृक्षलागवड करणे, लोकजागृती मधून निसर्गसंवर्धन, पोलिसांना मदत, रक्तदान असे विविध उपक्रम ते राबवत असतात. आतापर्यंत त्यांनी 10 वेळा रक्तदान केलं आहे. या पुढेही हे उपक्रम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेवारत्न व समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

MahaBulletin Team

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.