सलून दुकानदारांना रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी मिळावी : अँड. निकम

महाबुलेटीन नेटवर्क / हनुमंत देवकर
राजगुरूनगर : लॉकडाऊन काळात नाभिक समाज आर्थिक अडचणीत सापडला असून या व्यावसायिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. त्यांना पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी सलून दुकानांना सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी राजगुरूनगर, पुणे येथील विधिज्ञ व महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्य कार्यकारिणी सदस्या अँड. मोनिका बाळकृष्ण निकम यांनी केली आहे.
कोरोना विषाणू संसर्गामुळे शासनाने लागू केलेल्या लॉक डाऊन मूळे नाभिक समाजाचा परंपरागत सलून व्यवसाय गेल्या तीन महिन्यांपासून बंद होता. शासनाने दिनांक २८ जून २०२० पासून सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत शासनाने नुकताच निर्णय जाहीर केला आहे.
शासन व आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्र वगळता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु ९ ते ५ हा आॉफिशियल टायमिंग असून या कालावधीत ग्राहक त्यांच्या नियमित कामात व्यस्त असल्यामुळे काम सोडून सलून मध्ये येवू शकत नाही. व्यापारी वर्ग, नोकरदारवर्ग या कालावधीत व्यस्त असल्यामुळे सलुन मध्ये येवू शकत नाही.
सलून हा व्यवसाय शक्यतो सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा चालू असतो, मात्र लॉकडाऊनमुळे ३ महिने ठप्प झाला होता. सध्याच्या वेळेनुसार फार कमी प्रमाणात ग्राहक येत असल्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे दुकान चालू असूनही समाजाचे आर्थिक नुकसान होत आहे. नाभिक बांधवांना यामुळे त्यांचे दुकानाचे भाडे अथवा उदरनिर्वाह करणे अवघड झाले असून ते कर्जबाजारी झाले आहे. तरी ग्राहकांची सोय व नाभिक बांधवांची होणारी होरपळ थांबावी, अशी नाभिक समाजाची मागणी आहे. तमाम नाभिक समाजाकडून शासन दरबारी विनंती करण्यात येते की, सलून व्यवसाय सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी मिळावी. यासाठी शासनाच्या सर्व अटी व शर्ती चे पालन केले जाईल, असे आश्वासन नाभिक समाजाने दिले आहे.
admin

Share
Published by
admin

Recent Posts

MahaBulletin — 07 Sep 2026

रविवार, ६ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 कामगार…

3 days ago

MahaBulletin — 06 Sep 2026

शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

4 days ago

MahaBulletin — 05 Sep 2026

गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 चाकण…

5 days ago

MahaBulletin — 03 Sep 2026

मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ कुकडी…

7 days ago

MahaBulletin — 01 Sep 2026

सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 राजगुरुनगरमध्ये…

1 week ago

MahaBulletin — 31 Aug 2026

रविवार, ३० ऑगस्ट २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 अपघातांची…

1 week ago

This website uses cookies.