महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शिर्डी : साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज ( दि. २६ ) मध्यरात्री दुःखद निधन झाले.
यादव यांच्यावर मागील आठवड्यापासून नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काल त्यांची तब्बेत अधिकच बिघडल्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातच आज रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
यादव यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
मोहन यादव यांनी सोळा वर्षांपासून साई संस्थानच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली. त्यांच्याच माध्यमातून साईभक्त के. व्ही. रमणी यांनी साई संस्थानला ११० कोटीच्या देणगीतून साई आश्रम इमारत बांधून दिली. त्याच इमारतीतील काही भागात आज कोरोना रुग्णांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू आहे. यादव यांचा देशविदेशात मोठा जनसंपर्क असल्याने संस्थानला विशेषतः रुग्णालयासह संस्थान मधील विविध विभागांना अनेक मोठ्या देणग्या मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
यादव यांनी लिहिलेल्या श्री साईचरित्र दर्शन या पुस्तकाचा जवळपास बारा भाषेत अनुवाद झालेला आहे.
सोमवार, ८ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 गुन्हेगारीवर…
रविवार, ७ जून २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 खेडमध्ये…
शनिवार, १६ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 पिंपरी…
रविवार, १० मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 चाकण…
शनिवार, ९ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🚨 वृद्धेचा…
शुक्रवार, ८ मे २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🐾 बिबट्याची…
This website uses cookies.