कोरोना

माजी मंत्री, आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रकृतीसाठी चाकण मध्ये महेश जाधव मित्र परिवाराचे गणरायाला साकडे…

महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
चाकण : मा. राज्यमंञी अर्जुनभाऊ खोतकर यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी महेश जाधव मित्र परिवाराच्या वतीने कडाचीवाडी येथील महागणपतीच्या चरणी अभिषेक करून महाआरती करण्यात आली.

कोविड -19 या संसर्गजन्य आजारामुळे उद्धवलेल्या संकटाच्या काळात गोरगरीब जनतेला आधार देण्यासाठी शिवसेना नेते व माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी 10 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. कोरोना ग्रस्त रुग्णाना सहकार्य, रक्तदान शिबिर, मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून मुंबई येथे कोरोना ग्रस्त व कोरोना योद्ध्यांसाठी मदतही पाठवली. तथापि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सूधारणा व्हावी अशी प्रार्थना केली.

तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी पिक विमाचा लाभ देण्यासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी खोतकर यांनी खबरदारी घेऊनही लोकसंपर्क टाळता आला नाही. यामध्येच त्यांना कोविडने गाठले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी कडाचीवाडी येथील गणेश मंदिरात महाआरती करून विघ्नहर्ता गणेशाकडे त्यांची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना केली. यावेळी महेशशेठ जाधव, मा. सरपंच शशीकांत नाणेकर, दिपक नाणेकर, वैभव जाधव, रुपेश नाणेकर, काळुराम नाणेकर, संतोष जाधव, शिवराज नाणेकर, प्रविण नाणेकर, विजय नाणेकर, काळुसकर काका, रोहन वाडेकर, नितिन वाव्हळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MahaBulletin Team

Recent Posts

MahaBulletin — 23 Jul 2026

बुधवार, २२ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 5 बातम्या 💧 अतिवृष्टी…

3 days ago

MahaBulletin — 20 Jul 2026

रविवार, १९ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ पुरंदर…

6 days ago

MahaBulletin — 18 Jul 2026

शुक्रवार, १७ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🛣️ तीन…

1 week ago

MahaBulletin — 17 Jul 2026

बुधवार, १५ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 📰 खेड…

1 week ago

MahaBulletin — 14 Jul 2026

सोमवार, १३ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 पंढरीच्या…

2 weeks ago

MahaBulletin — 13 Jul 2026

शनिवार, ११ जुलै २०२६ 📍 खेड - चाकण आजच्या ठळक बातम्या 6 बातम्या 🔥 मोशी…

2 weeks ago

This website uses cookies.