महाबुलेटीन न्यूज : प्रतिनिधी
म्हाळुंगे : कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असताना देखील आपल्या सामाजिक कार्याची परंपरा खंडित होऊ नये, म्हणून म्हाळुंगे इंगळे ( ता. खेड ) येथील सहयोग मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
त्यासाठी मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आज कोरोनाच्या संकटसमयी समाजाला अत्यंत गरज असलेले विधायक काम केलेले आहे. ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
असं म्हणतात कि, गरजेच्या वेळी केलेले दान हे नेहमीच श्रेष्ठ असते आणि त्यालाच अनुसरून कोरोनाची भीती असतानादेखील योग्य ती खबरदारी घेऊन सुरक्षित अंतर ठेवून सर्व नियमांचे पालन करून आपल्या सामाजिक कार्याची परंपरा अखंडितपणे चालू ठेवली.
यावेळी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात घटकांचे आणि मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव वर्पे, चाकण ब्लड बँकेचे संचालक चंद्रकांत हिवरकर, सहयोग मित्र मंडळाचे योगेश तुपे, दत्तात्रय महाळुंगकर, दिनकर महाळुंगकर, मुकुंद महाळुंगकर, अमित तुपे, शैलेश जाधव, अमित पवार, विक्रम महाळुंगकर, महेश जाधव, दिनेश गायकवाड, समीर भोसले आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
——
महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…
महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…
महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण ( पुणे ) : महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे…
महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…
This website uses cookies.