रोटरीने राबवलेल्या हॅप्पी स्कुल, डिजिटल स्कुल संकल्पना अभिनव : आमदार दिलीप मोहिते पाटील

रोटरी क्लब राजगुरुनगरने शैक्षणिक परिवर्तनासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद : सभापती अंकुश राक्षे
राजगुरूनगर रोटरीच्या वतीने शाळांना स्मार्ट टी.व्ही. व शालेय साहित्यांचे वाटप.
महाबुलेटीन नेटवर्क / मिलिंद शिंदे
राजगुरूनगर : रोटरी क्लब ऑफ राजगुरूनगरच्या वतीने खेड तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील एकूण १२ ज़िल्हा परिषद शाळांना १७ स्मार्ट टी.व्ही. तसेच दफ्तर, वह्या, पॅड ,पेन्सिल, कंपास, मास्क, सॅनिटायझर अशा विविध शालेय साहित्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुक्याचे आमदार दिलीपराव मोहिते पाटील, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, उपसभापती ज्योतीताई अरगडे, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे गव्हर्नर रो. रवी धोत्रे, रोटरी क्लब ऑफ राजगुरूनागरचे अध्यक्ष रो. नरेश हेडा, सचिव सुधीर येवले, खजिनदार रो. अविनाश कहाणे,रो. ज्ञानेश्वर करंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले मनोगत व्यक्त करताना सभापती अंकुश राक्षे यांनी “रोटरी क्लब राजगुरुनगरने शैक्षणिक परिवर्तनासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे, ग्रामीण भागातील शाळा डिजिटल व अत्याधुनिक झाल्यातर त्याचा फायदा तेथील विद्यार्थ्यांना होईल” असे मत व्यक्त केले.
आमदार दिलीपशेठ मोहिते पाटील यांनी आपल्या मनोगता मध्ये “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत रोटरीने चांगला उपक्रम राबविला आहे. स्मार्ट टि.व्हि. मुळे विद्यार्थी त्यांचा अभ्यास प्रभावीपणे आत्मसात करतील.  हॅपी स्कूल, डिजिटल स्कूल या रोटरीने राबवलेल्या संकल्पना अभिनव असून देशाची भावी संपत्ती असलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गरजेच्या आहेत” असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या संकट काळात रोटरीने चालवलेल्या रोटरी भोजनालयाचे देखील कौतुक त्यांनी केले. तसेच जगातून पोलिओचे समुळ उच्च्याटन रोटरीच्या माध्यमातूनच झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. रवी धोत्रे यांनी सन २०१९-२० मध्ये पुणे जिल्ह्यात तर अध्यक्ष रो. नरेश हेडा यांनी खेड तालुक्यात रोटरीने केलेल्या भरीव कामांची माहिती उपस्थितांना दिली. वर्षभरात रोटरी क्लब राजगुरूनागरने सुमारे ४१ लाख रकमेची सामाजिक कामे केली असल्याची माहिती अध्यक्ष हेडा यांनी दिली. तसेच येत्या काही वर्षात खेड तालुक्यातील सर्वच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी गट शिक्षण अधिकारी संजय नाईकडे, गट विकास अधिकारी अजय जोशी, असिस्टंट गव्हर्नर रो. शेखर झिलपेलवार यांची भाषणे झाली. सदर कार्यक्रमास निगडी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विजय काळभोर, आकुर्डी क्लबचे अध्यक्ष रो. जिग्नेश आगरवाल, देहूरोड क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सर्व संबधीत शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
या उपक्रमासाठी रो. संजय कडलग रो. दत्तात्रय सांडभोर, रो. अविनाश कोहिनकर आणि रो. सुधीर येवले यांनी मोलाची आर्थिक मदत केल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. रो. सुधीर मांदळे यांनी आभार व्यक्त केले.
admin

Recent Posts

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

महाबुलेटीन न्यूज l किशोर कराळे मुंबई, दि. ७: पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात…

2 months ago

पुणे-रायगड-नगर-नाशिक जिल्ह्यासाठी GOOD NEWS..!

महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे : हडपसर ते यवत आणि‌ तळेगाव-चाकण शिक्रापूर महामार्गाच्या रुंदीकरणासाठी…

2 months ago

एक वर्षांपासून वाँटेड आरोपीस पिस्तूलसह अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

महाबुलेटीन न्यूज महाळुंगे ( चाकण एमआयडीसी ) : एक वर्षापासुन पाहीजे असलेल्या आरोपी कडुन १…

2 months ago

40 वर्षांच्या तलाठ्यासोबत 20 वर्षीय कॉलेज तरुणी आढळली मृतावस्थेत, पुणे जिल्ह्यातील घटना, कार अन् चपलेमुळे भयंकर प्रकार समोर

महाबुलेटीन न्यूज | आनंद कांबळे जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात एक धक्कादायक…

2 months ago

खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालकपदी सतीश चांभारे यांची निवड

महाबुलेटीन न्यूज | राजगुरूनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समिती सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची खेड…

3 months ago

This website uses cookies.