महाबुलेटीन न्यूज
चाकण : रोहकल( ता. खेड ) येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक विशाल जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले व त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देत,त्यांची दलितांविषयी तळमळ, त्यांचे पुरोगामी विचार, शिक्षणविषयक त्यांचा दृष्टीकोन, तळमळ, शिक्षण घेत असतांना घेतलेले परिश्रम, त्यांच्यातील आत्मविश्वास, दुरदर्शीपणा इत्यादी विषयी सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी गीते, भाषणे, नाट्य सादरीकरण याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दृष्टी, विचार आणि तत्त्वे यांना आदरांजली वाहिली. डॉ. आंबेडकरांचे कार्य पुढे कसे नेता येईल याचा विचार करा, फक्त त्यांनी करून ठेवलंय, म्हणून निश्चिंत राहू नका. स्वकर्तृत्वावर स्वतःला सिद्ध करा, असा संदेश विद्यार्थ्यांनीं आपली मनोगते व्यक्त करताना दिला. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थांनी अभिवादन केले.
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 15 : राज्याच्या खेडोपाड्यातील 7 कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर चाकण : बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी-चिंचवड…
मुंबई : "विशेष जनसुरक्षा कायद्याचा" बडगा राज्य सरकार महाराष्ट्रातील पत्रकार आणि जनतेवर उगारू पहात आहे.…
महाबुलेटीन न्यूज | किशोर कराळे मुंबई, दि. 24 : "क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती…
महाबुलेटीन न्यूज | Mahabulletin News Small Business Loan : खास महिलांसाठी केंद्र शासनाकडून नवीन उद्योगिनी…
महाबुलेटीन न्यूज | प्रसन्नकुमार देवकर पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगरच्या साईनाथ मांजरे या मराठी तरुणाने ट्रॅव्हलसचा व्यवसाय…
This website uses cookies.